लेख-समिक्षण

व्हॉटसअ‍ॅप चॅटस् सुरक्षित ठेवण्यासाठी….

गेल्या काही महिन्यांत व्हॉटसअ‍ॅप चॅट्स आणि डेटा लीक होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक चॅटस् सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक झाले आहे. जर तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल आणि तुमच्या खासगी चॅटस्ना सुरक्षित ठेवू इच्छित असाल, तर यासाठी काही टिप्स जाणून घ्या. यामुळे तुमचे चॅटस् लीक होण्याची शयता जवळजवळ शून्य होईल.
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट लॉक नावाचे एक फीचर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या खासगी चॅटस्ना लॉक करू शकता. यासाठी तुम्ही फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करू शकता. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप उघडा.
चॅट लिस्टमधून त्या चॅट विंडोमध्ये जा.
जे चॅटस् तुम्हाला सुरक्षित ठेवायचे आहेत आता त्या कॉन्टॅटच्या नावावर टॅप करा. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.त्या विंडोमध्ये लॉक चॅट हा पर्याय दिसेल, तो ऑन करा.
यानंतर फेस अनलॉक किंवा फिंगरप्रिंट यापैकी एक पर्याय निवडा. आता ते चॅट लॉक होईल आणि ते फक्त तुम्हीच अनलॉक करू शकाल.
इतर काही महत्त्वाचे टिप्स: चॅट लॉक फिचरशिवाय टू-स्टेप व्हेरिफिकेशन फंशन वापरा. यामुळे तुमच्या अकाउंटसाठी अतिरिक्त सुरक्षा स्तर मिळतो.
तुमच्या व्हॉटसअ‍ॅप अकाउंटशी लिंक असलेले डिव्हाइसेस वेळोवेळी तपासा. जर कोणते अनोळखी डिव्हाइस दिसले, तर ते ताबडतोब रिमूव करा.
चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरा.
तुमच्या चॅट्सचा नियमित बॅकअप घ्या, म्हणजे डेटा हरवल्यासही तो पुन्हा मिळवता येईल.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …