लेख-समिक्षण

विद्युतवाहन क्षेत्रात करिअर करायचंय?

इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि वेगाने वाढणारा क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट कौशल्ये आणि गुणधर्म असणे आवश्यक आहे.
1. तांत्रिक कौशल्ये: ईव्ही तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि त्यात पुढे जाण्यासाठी काही तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची आहेत.
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ज्ञान: इलेक्ट्रिक वाहने मुख्यतः बॅटरी, मोटर, नियंत्रक आणि सेन्सरवर कार्य करतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये मूलभूत समज असणे आवश्यक आहे.
बॅटरी व्यवस्थापन प्रणाली: ईव्हीमध्ये लिथियम-आयन बॅटरी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्याच्या सुरक्षित वापरासाठी बॅटरी व्यवस्थापन प्रणालीबाबत समज असणे महत्त्वाचे आहे.
संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्ये: वाहन नियंत्रण प्रणाली, सेन्सर्स, स्वयंचलित प्रणाली यासाठी प्रोग्रामिंग आणि संगणक प्रणालींचे ज्ञान आवश्यक आहे.
2. नाविन्यपूर्ण विचार आणि संशोधनवृत्ती: एत उद्योग हे नवनवीन संशोधन आणि नवसंशोधन यांवर आधारित आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि सुधारणा शोधण्याची आवड असणे, ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संशोधन करण्याची तयारी, वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयोगशील वृत्ती असणे आवश्यक आहे.
3. प्रकल्प व्यवस्थापन आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये: ईव्ही क्षेत्रात उत्पादन आणि तंत्रज्ञान यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य असणे गरजेचे आहे. तसेच समस्या ओळखून त्यावर त्वरित उपाय शोधण्याची क्षमता असाव्यात. तसेच वेळेचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्यही गरजेचे आहे.
4. पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल जागरूकता: ईव्ही क्षेत्र हे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी विकसित होत आहे. त्यामुळे हरित उर्जेचा प्रभाव आणि त्याचा वापर याबद्दल जागरूकता असणे, प्रदूषण आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपायांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
5. व्यवसाय आणि मार्केटिंग कौशल्ये : ईव्ही क्षेत्रात केवळ तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची नसून, बाजारपेठ समजणे आणि व्यवसाय कौशल्ये असणेही गरजेचे आहे.
बाजारातील नवीन ट्रेंड समजून घेण्याची क्षमता
ग्राहकांच्या गरजा ओळखण्याची आणि त्यानुसार सेवा प्रदान करण्याची क्षमता, तसेच व्यवसाय विकास, विक्री आणि विपणन यामधील समज असायला हवी.
6. संघात काम करण्याची आणि नेतृत्वाची क्षमता: ईव्ही क्षेत्रात विविध प्रकारच्या टीम्स असतात तांत्रिक, व्यवस्थापन, उत्पादन, विपणन इत्यादी. त्यामुळे — संघाबरोबर समन्वय ठेवण्याची कौशल्ये असणे, टीम व्यवस्थापन आणि नेतृत्वगुण असणे.
7. सातत्याने शिकण्याची मानसिकता: ईव्ही उद्योग सातत्याने बदलत असून, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे —सतत नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची तयारी असणे, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असणे आवश्यक आहे.
(उत्तरार्ध)

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …