देशभरातील जंगलांमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण, खाणकाम आणि मानवी हस्तक्षेपाचा कहर सुरू आहे. यामुळे जंगलांमधील वाघांचे सुरक्षित अधिवास धोयात आले आहेत. जंगलांची सतत होत असलेली कत्तल त्यांच्या आहाराच्या समस्याही वाढवत आहे. जंगलाच्या आत रस्त्यांचे जाळे, पर्यटनामुळे होणारा गोंगाट आणि मानवी हालचालींमुळे नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की, आता वाघ जंगलाबाहेर पडू लागले आहेत. पाणी व अन्नाच्या शोधात भटकणारे हे वन्यजीव माणसांसाठी धोकादायक ठरत आहेतच, पण त्यांच्या अस्तित्वावरही संकट गडद होत आहे.
गेल्या काही वर्षांत माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब अधोरेखित झाली आहे. त्यानुसार २०२१ ते २०२५ या चार वर्षांदरम्यान देशभरात ६६७ वाघांचा मृत्यू झाले असून, त्यापैकी ३४१ वाघांचा मृत्यू अभयारण्याबाहेर झाला आहे. या अहवालाने अभयारण्यांच्या देखभालीतील आणि व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीही उघड झाल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, अभयारण्यांतील ठराविक मार्ग आणि प्राण्यांच्या वावरण्यासाठी असलेल्या कॉरिडॉर असूनही वाघ आणि बिबटे थेट गावांमध्ये किंवा शहरांपर्यंत कसे पोहोचतात? याचा अर्थ असा होतो का की जंगलांचे क्षेत्रफळ वाघांसाठी अपुरा ठरू लागला आहे? वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अद्याप मजबूत यंत्रणा उभी राहिली नाही का?अनेक ठिकाणी कुंपणबंदी किंवा बफर झोनचे व्यवस्थापनच नाही, त्यामुळे वाघ आपापल्या अधिवासातून बाहेर पडले तरी त्याचा मागोवा वेळेत लागत नाही. ड्रोन, जीपीएस कॉलर आणि सेन्सर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असूनही नियमित व प्रभावी निगराणी का शय होत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.यासोबतच जंगलात वाघांसाठी अन्नसाखळी टिकून आहे का, हा मुद्दाही समोर येतो. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशात गेल्या दोन दशकांत झालेली मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड आता थेट दिसून येत आहे. केवळ चार वर्षांत राज्यातील अभयारण्याबाहेर पडलेल्या ९० वाघांचा मृत्यू ही साधी घटना नाही.यावरून स्पष्ट होते की शासन आणि प्रशासनाने केवळ वाघांची संख्या वाढवण्यावर भर देऊन चालणार नाही, तर त्यांचे सुरक्षित अधिवास आणि हालचालीसाठी पुरेशी जागा निर्माण करणे, शिकार प्रजातींची संख्या वाढवणे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित सततची देखरेख आवश्यक आहे.हे सर्व फक्त अर्धवट योजनांनी साध्य होणार नाही, तर नवोन्मेषी व दीर्घकालीन उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. यासाठी वन्यजीव तज्ज्ञ, स्थानिक समुदाय आणि प्रशासन यांच्या समन्वयातून ठोस कृती आराखडा तयार करावा लागेल, अन्यथा वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे भविष्य धोयात येऊ शकते
– रंगनाथ कोकणे,
पर्यावरण अभ्यासक.
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र