चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोण ही शिस्तप्रियतेसाठी ओळखली जाते. वेळेचं काटेकोर पालन, सेटवरचे वर्तन, ताणतणावातही शांत राहण्याची क्षमता हे सर्व तिच्या व्यावसायिक मूल्यांचे उदाहरण आहे. दीपिकाचे निवडलेले सिनेमे तिच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. ‘छपाक’ या चित्रपटात तिने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली. पद्मावत, गोलियों की रासलीला, रामलीला, पिकू यांसारख्या चित्रपटांतून तिने स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवले; पण प्रत्येक भूमिकेत स्वतःचा आत्मसन्मान जपणारी स्त्री दाखवली. हे चित्रपट समाजात स्त्री शक्तीचा संदेश देणारे आहेत.
दीपिकाच्या मुलाखतींतून तिची अंतर्मुख वृत्ती जाणवते. प्रसिद्धीच्या झगमगाटातही ती स्वतःला विसरत नाही. मी आधी ‘माणूस’ आहे आणि मग ‘अभिनेत्री’, हे तिच्या वागणुकीतून स्पष्ट होते. समाजमाध्यमांवर तिची उपस्थिती सौम्य असते आणि ती प्रामुख्याने सकारात्मक विचारच मांडते. प्रसिद्धीमुळे आलेल्या अहंकारापासून दूर राहणे हे प्रत्येक कलाकारासाठी शय नसते, पण दीपिका त्याला अपवाद आहे.
अनेक सहकलाकारांनी वेळोवेळी सांगितले आहे की दीपिकासोबत काम करताना तिचा आदर वाटतो. ती प्रत्येक तंत्रज्ञालाही तेवढाच मान देते, जितका अभिनेत्याला. अलीकडेच ‘गोलमाल’ आणि ‘कॉप युनिव्हर्स’साठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी अलीकडेच बॉलीवूडमधील कलाकारांसोबतच्या त्यांच्या नात्याशी संबंधित काही किस्से शेअर केले. यामध्ये त्यांनी दीपिका पदुकोणबद्दल बोलताना काही महत्त्वाची माहितीही शेअर केली. ते म्हणाले, आमच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे शेवटचे वेळापत्रक बाकी असताना, दीपिका पदुकोण चार महिन्यांची गर्भवती होती. पण तरीही ती शूटिंगसाठी आली. या अवघडलेल्या स्थितीतही तिचा व्यावसायिक दृष्टिकोन कमी झाला नाही. तिने तिच्या वचनबद्धतेची पूर्तता केली. अशी कमिटमेंट अपवादाने आढळते, असे ते म्हणाले. दरम्यान, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांची मुख्यभूमिका असलेला ’पिकू’ चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ८ मे २०१५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र