लेख-समिक्षण

राज कपूर ः द ग्रेट शोमन

हिंदी चित्रपटसृष्टिचे ग्रेट शोमन राज कपूर यांच्याबद्दल ठळक गोष्टी सर्वांनाच माहिती असतील. पण ते कसे घडले. त्या सर्वांची पार्श्वभूमी काय होती, हे जाणून घेताना प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा काही घटना या ‌‘शोमॅन‌’च्या आयुष्यात घडल्या. काही अफवा पसरल्या. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे, परिस्थितीला बिनधास्तपणे, आव्हानात्मकरित्या स्वीकारण्याच्या स्वभावामुळे त्या अफवांना चांगलं पीक आलं. त्यांच्या देखणेपणामुळे त्या गोष्टींना अधिकाधिक खतपाणी मिळालं. त्या गोष्टी अधिक ठळक होत गेल्या. पण त्यामागची कारणं जाणून घेता ते घडणं साहजिकच मानलं पाहिजे. एवढं देखणं, रुबाबदार व्यक्तीमत्व, मृदुभाषी अभिनेता लाभला हे बॉलीवुडचे भाग्य ठरलं. राजकपूर यांच्या जन्मदिवशी म्हणजे 14 डिसेंबरला दरवर्षी कपुर कुटुंबिय जयंती साजरी करतात. कारण राजकपूर हे कपूर घराण्याला मिळालेली मोलाची देणगी आणि कर्तत्ववान असलेली व्यक्ती होती. पुढील पिढीला त्यांच्याकडून जो वारसा मिळाला तो बहुमुल्य आहे. त्यांनी जे निर्णय घेतले ते पुढील पिढीसाठी मार्गदर्शनपर ठरले ते निर्णय काय होते आणि काय घडलं, ते तसे का घडले आणि कशामुळे हे जाणून घेऊया.- शरयू माने
राज कपुर यांचा जन्म पेशावर येथे झाला. पेशावर म्हणजे आत्ताचे पाकिस्तान. ब्रिटिशकालीन भारतातील अलिशान अशा कपूर हवेलीमध्ये त्यांचे बालपए गेले. राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेस्वरनाथ कपूर हे भारतीय इंपिरियल पोलिस दलाचे अधिकारी होते. पेशावर मध्ये किरया खवानी बाजारामध्ये त्यांचा एक मोठा वाडा होता. राजकपूर यांचे पणजोबा दिवाण मुरलीलाल कपूर हे फैसलाबाद (लायपुर) च्या नजीकच्या मरीनमध्ये तहसीलदार होते. राज कपूर ऊर्फ सृष्टीनाथ कपूर ऊर्फ रणबीर राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे बालपण या वाड्यामध्ये गेले. पृथ्वीराज कपूर यांनी नंतर वकीलीचे शिक्षण घेतले पण त्यात त्यांचे मन रमेना. भारतात गुलामीचे दिवस होते. हिंदी सिनेमान त्यावेळी विदेशी ट्रेंडचे सावट पहायला मिळायचे याच कारणामुळे !
अवघ्या वर्षभरातच त्यांनी वकीलीचे शिक्षण अर्धवट सोडून अभिनयात आपले कौशल्य दाखविण्यास सुरुवात केली. शिक्षणाला विरामच दिला. सुरुवातीला नाटकांमध्ये अभिनय केला. त्यांचे वडील नाराज झाले. 1923 मध्ये त्यांनी राज कपूर यांच्या आईशी- राम सरणी मेहरा यांच्याशी विवाह केला. या दरम्यान ते 17 वर्षाचे होते व राम सरणी मेहरा या 15 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्या गरोदर राहिल्या. पृथ्वीराज कपूर यांनी मुलगा व्हावा या इच्छिने त्याचे नावही अधीच ठरवून टाकले. रणबीर राज ! हे नाव एका कागदाच्या चिटोर्यावर लिहून त्यांनी तो कागद आपल्या पत्नीच्या उशाखाली ठेऊन दिला. नंतर 14 डिसेंबर 1924 ला त्यांना पुत्ररत्न झाले. तेच शोमॅन म्हणून नावारुपाला आलेले राज कपूर ऊर्फ रणबीर राज कपूर ऊर्फ सृष्टीनाथ कपूर !
पृथ्वीराज कपूर यांना दोन आपत्त्ये झाली. रविंदर आणि देवेंद्र ! पण पृथ्वीराज जेव्हा मुलांना घेऊन 1927 साली मुंबईला स्थायिक झाले, तेव्हा एकेदिवशी रविंदर बाहेर खेळायला गेला आणि उंदराचे औषध चॉकलेट समजून खाल्ले त्यात त्याचा मृत्यु झाला. दुसरा भाऊ देवेंद्र अवघ्या एक आठवड्याच्या अंतरावर न्युमोनियाने गेला. पृथ्वीराज कपूर आणि त्यांच्या पत्नी यांना दुःख अनावर होते. राज कपूर भावंडाविना एकाकी पडले. त्यानंतर पुढे 7 वर्षांनी शम्मी कपूर यांचा जन्म झाला. पुढे 7 वर्षांनी शशी कपूर जन्माला आले. वयातील या तफावतीमुळे राज कपूर यांनी आपल्या या दोन भावडांना मुलांप्रमाणे प्रेम दिले. या दोन भावंडापैकी राज कपूर यांना अभिनयासोबत गाण्याचीही प्रचंड आवड होती. यांच्या या आवडी किंवा सवयीमुळे शाळेत शिकत असताना काही मजेशीर किस्सेही घडून गेले. खाण्याच्या आवडीविषयी त्यांनी शाळेत एका नाटकामध्ये भाग घेतला होता. उत्साहाच्या ओघात ते स्टेजवर प्रेक्षकांसमोर पडलेही होते. शिक्षकांचा मारही खावा लागला आणि ते त्यांच्यावर ओरडले, आणि ‌‘पुन्हा नाटकांमध्ये भाग घेऊ नकोस ‌’ हेही बजावले असे असताना राज कपूर पुढे शोमॅन म्हणून ओळखले जाऊ लागले, ज्यांना अभिनयावर लक्ष केंद्रीत करु लागले. अभिनय त्यांच्या नसानसांतून वाहू लागला. घरात अलिशान गाडी असताना ते शाळेला ट्रामनेच जात. कारण पृथ्वीराज कपूर हे खूप शिस्तप्रिय होते. तितकेच हौशीही होते.
लहानपणी अभिनय जमला नाही पण सिनेमा पाहण्यासाठी ते उत्सुक असत. एकदा त्यांच्या आईने त्यांना सिनेमा पाहण्यासाठी एक रुपया दिला. तेव्हा चार आण्याला तिकिट होते. पण सिनेमाला गर्दी झाली आणि ते तिकिट बारा आणे भावाने घ्यावे लागले. तिकिटाची किंमत वाढली होती. तेव्हा त्यांनी कुटुंबासोबत सिनेमा न पाहता एकट्टयानेच पहिला. तो सिनेमा होता ‌‘गलिव्हर ट्रॅव्ल्स !‌’ हा सिनेमा त्यांना इतका आवडला की पुढे त्यांची सिनेमा हीच एकमेव आवड बनली. त्यांनी अभ्यासातून लक्ष काढून टाकलं. शाळेत गैरहजर राहू लागले. मॅट्रिकच्या परिक्षेला त्यांना बसण्यास मनाई केली गेली. ते वडिलांनी विचारताच बोलेले मला चित्रपटात काम करायचे आहे.‌’ पदवी घेतल्यानंतरही मी तुमच्यासमोर नोकरी लावण्यासाठी शिफारशी संदर्भात उभा असेन ते मी आत्ताच सांगतो, मला चित्रपटामध्येच काम करायचंय पृथ्वीराज कपूर स्वतः असेच वडिलांना विनवनी करुन चित्रपटांत अभिनय क्षेत्रामध्ये आले होते. ते आठवून ते हळवे झाले. त्यांनी पेशावर सोडले आणि मुंबईला येऊन स्थायिक झाले. पृथ्वीराज यांनी राज कपूर यांच्या निर्णयाला संमत्तीदाखल त्यांना काही पैसे दिले, आणि म्हणाले सर्व नातेवाईकांना भेट आणि त्यानंतर वाटलं चित्रपटात आपण काम करु शकतो तर अवश्य कर. राज कपूर सर्वांचा पाहुणचार घेऊन आले ते इतके भारले होते तरीही त्यांनी ठरवलं आपण स्वतःचे अस्तित्व, इज्जत मिळवायची. ऐश्वर्य असल्यामुळे कोणीही इज्जतीचा भागीदार होऊ शकतो पण मला स्वतःची इज्जत हवीय. त्यांनी आपला निर्णय
पृथ्वीराज कपूर यांना सांगून टाकला. तसं पृथ्वीराज कपूरनी रणजीत स्टुडिओच्या मालकाला, चंदुलाल शहा यांना फोन करुन राज कपुरना कामावर ठेवण्यासाठी सांगितले. अर्थात त्यानंतर राज कपूर यांना आपलं विलासी जगणं काही काळासाठी विसरुन तिथे राबावं लागलं. त्यांना वडिलांनी सांगून हे ठेवल्याप्रमाणे पगार देण्यात आला नाही शिवाय कामगाराप्रमाणे काम करावं लागलं. वडिलांच्या सर्व अटी त्यांना मान्य होत्या. त्यानंतरच त्यांनी स्टुडिओमध्ये पाऊल टाकले. केदार शर्मा यांच्याकडे राज कपूरनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. पृथ्वी थिएटरसाठी ही काम केले. पेमनाथ यांना ते भेटले. तिथे त्यांची बहिण कृष्णाराज यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याचक्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. त्या संगीत शिकत होत्या. 12 मे 1946 रोजी ते कृष्णा यांच्या सोबत विवाहबंधनात अडकले. त्यांचा संसार नीटनेटका होता. अभिनय क्षेत्रात राजकपूर आपली छाप उमटवू लागले होते. त्यांच्या नीलकमल या चित्रपटामुळे त्यांची प्रशंसा होऊ लागली. पुढे 1948 मध्ये ते 24 वर्षांचे असताना आर.के. स्टुडिओची त्यांनी स्थापना केली. ‌‘बरसात‌’ या आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले. भूमिकाही केली. नर्गिससोबतचा हा त्याचा पहिला चित्रपट होता. नंतर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन भूमिका सहित पार पाडले.
मेरा नाम जोकर हा रशियन कलाकार घेतल्याने भारताबाहेर म्हणजे रशियामध्ये लोकप्रिय ठरला. राजकपूर यांचे स्मारक तेथे उभारले. रशियन जनता त्यांच्यावर फिदा झाली. मेरा नाम जोकर ही नायकांच्या भूमिकेतील त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाचे चित्रिकरण बरेच दिवस चालले. हा 4 तासांचा सिनेमा होता. त्यामुळे त्याला दोन मध्यंतर होती. त्या चित्रपटाची लोकप्रियता नंतर कमी झाली आणि एकच मध्यंतर ठेवण्यात आले. मेरा नाम जोकरच्या व्यावसायिक अपयशामुळे आर.के. फिल्मस्‌‍ संकटात आली. राज कपूर खचले. त्यांच्या मोठ्या मुलग्याने अर्थिक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून ‌‘ कल आज और कल‌’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात कपूर लोकांच्या तिन्ही पिढ्याचं चरित्र चित्रण समांतर दर्शविलेले आहे. यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर यांनी भूमिका साकारल्या. काही दिवसांतच दुसर्या मुलाला त्यांनी प्रमुख भूमिकेत आणलं. ऋषी कपूरनी बॉबी या चित्रपटात पहिल्यांदा नायकाची भूमिका केली. हा चित्रपट एवढा गाजला की आर के फिल्मस पुनः पुर्ववत सुस्थितीत आलं. या सर्व चित्रपटानंतर 40 च्या दशकामध्ये राज कपूर यांनी स्त्री कलाकारांना प्राधान्य देत सामाजिक चित्रपटांमध्ये स्त्री कलाकाराचे नेतृत्व असणारे चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केले. सत्यम शिवम सुंदरम- 1978, (झिनत आमन), प्रेमरोग- 1982, (पद्मिनी कोल्हापूरे), राम तेरी गंगा मैली-1985 (मंदाकिनी) असे चित्रपट स्त्रियांच्या (नायिकांच्या) अंतरंग प्रदर्शनामुळे चर्चेत राहिले पण यामुळे काही प्रतिस्पर्धांनी राज कपूर तथा आर के फिल्मस्‌‍ ची प्रतिमा डागाळणारी वक्तव्ये केली काही लोकांत याच गोष्टींची ठळक चर्चा अजूनही राजकपूर आणि त्यांच्या परिवाराबाबत चर्चित होताना आढळते. पण खरे राज कपूर कपूर कळण्यासाठी पडद्याच्या मागची बाजू कोणालाच दिसली नसेल का ? पण या सर्व चर्चांचा त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीवर कोणताच परिणाम झाला नाही प्रसिद्धी तर वाढतच राहिली. त्यांच्या पुढच्या पिढीनेही प्रसिद्धीमध्ये भरच टाकली. नातवंड- करिष्मा कपूर, करिना कपूर, रणबीर कपूर, यांचे फिल्मी करियर यशस्वी राहिले. दरम्यान रणबीर कपूर यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केले खान दोस्त-1976, नौकरी- 1979 काळ पुढे सरकत राहिला. पण राज कपूर यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. तयांचे चित्रपटातील पात्र हे काहीसे चार्ली चॅप्लिनच्या चरित्राशी मिळते जुळते होते. चार्ली चॅप्लीन हे राज कपूर यांचे आवडते हिरो होते. त्यांना त्यांच्या विविध चित्रपटांसाठी परितोषीके मिळाली. त्यामध्ये 3 राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, 11 फिल्मफेअर पुरस्कार, 21 नामांकन यांचा समावेश आहे. भारत सरकार द्वारा त्यांना 1971 मध्ये पद्मभूषण आणि 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2001 मध्ये स्टारडस्ट ॲवार्ड मार्फत पुरस्कृत करुन सहस्त्र? सर्वश्र्ेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान करण्यात आले. दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना जेव्हा सन्मानित करण्यात येणार होते. त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालवत चालली होती. त्यांना दम्याचा त्रास होता. त्यांची प्रकृती गंभीर होती तरीही त्यांनी ऑक्सिजनचा मास्क काढला आणि ते पुरस्कार सोहळयाला गेले. पण त्यांचे नाव जेव्हा उच्चारले गेले तेव्हा ते मंचापर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत नव्हते. तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या तर्फे तो पुरस्कार देण्यात येणार होता. त्यांची स्थिती पाहून आर वेंकटरमण स्वतः त्यांच्या पर्यंत पुरस्कार देण्यासाठी पोहोचले. तेवढ्यात पुना राजकपूरना दम्याचा झटका आला. त्यांची स्थिती खालावली राष्ट्रपतींच्या ॲम्ब्युलन्समधूनच त्यांना इस्पितळात हलवण्यात आले. हा समारोह दिल्लीत असल्यामुळे सर्व परिवार मुंबईमध्ये होता. त्यांना कळवण्यात आले. त्यानंतर एका महिन्यात त्यांसे देहावसान झाले. या दिवशी ते त्याना न्यूमोनियाही झालेला होता. 2 जून 1988 या दिवशी ते आपल्यातून कायमचे निघून गेले. त्यांची प्रेम कहाणी, त्यांचे अभिनय क्षेत्रातील योगदान नेहमीच सर्वांच्या चर्चेत राहील आणि मनांतही कोरलेलं राहील.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …