लेख-समिक्षण

मोबाईलशिवाय मूल जेवत नसल्यास

आजकाल अनेक पालक अशी तक्रार करतात की त्यांचं मूल मोबाईलवर कार्टून, गाणी किंवा गेम्स पाहिल्याशिवाय जेवतच नाही. जेवणाच्या वेळेस मोबाईल दिल्याशिवाय ते एक घासही घेत नाहीत. ही सवय सुरुवातीला सोयीसाठी वाटली तरी नंतर ती गंभीर समस्या बनते. ही सवय मुलांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि सामाजिक वर्तनावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे वेळेत सावध होणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे.
कालागते ही सवय?

बहुतेक वेळा पालक जेव्हा मुलं जेवणात नखरे करु लागतात, प्रत्येक घासाला नकार देऊ लागतात, तेव्हा त्यांना गप्प बसवण्यासाठी आणि घास भरवण्यासाठी मोबाईल समोर ठेवतात. सुरुवातीला जेवण वेळेत होते म्हणून पालक खूश होतात. पण हळूहळू हे एक कंडीशनिंग तयार करतं. म्हणजेच मुलांच्या डोक्यात मोबाईलशिवाय जेवणच होणार नाही असा विचार तयार होतो.
बालमानसोपचार तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांनी मोबाईल पाहणे ही अत्यंत चुकीची सवय आहे. विशेषतः जेवताना स्क्रीनकडे लक्ष देण्यामुळे मुलांचे अन्नाशी नाते तुटते. अन्नाची चव, गंध, गुणवत्ता यापैकी कशाचंही भान राहात नाही. शिवाय, सतत स्क्रीनकडे पाहणं त्यांच्या मेंदूच्या वाढीवर वाईट परिणाम करतं. डोळ्यांवर ताण येतो, झोपेचा खोळंबा होतो आणि एकाग्रतेवर विपरित परिणाम होतो.
कशी सोडवायची सवय?
रसर्वांत पहिली गोष्ट लक्षात घ्या की, एकदम मोबाईल हिसकावून घेऊ नका. त्यामुळे मूल चिडचिड करू शकतं. मोबाईल हळूहळू दूर करा. जेवणाच्या आधीच मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा.
रजेवताना कार्टूनऐवजी त्याला तुम्ही गोष्टी सांगू शकता, गाणी म्हणू शकता. मुलाचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. संवाद साधा, प्रश्न विचारा. मुलांना संवाद खूप आवडतो.
रमुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. तुम्ही जर जेवताना मोबाईल वापरत असाल, तर तेही तसंच करणार. म्हणून पूर्ण कुटुंबाने ‌‘नो मोबाईल ऑन डिनर टेबल‌’ नियम पाळा.
रमुलांना एकटे जेवायला कंटाळा येतो. तुमच्यासोबत जेवताना त्यांना संवाद आणि सहवासाची सवय लागते. मोबाईलची गरज भासत नाही.
रजेवताना मुलांना त्यांची आवडती भाजी, पोळी, फळं द्या. आवडीचं अन्न मोबाईलशिवायही त्यांना आकर्षित करतं.
रजर मुलं फारच हट्टी असतील, तर सुरुवातीला एखाद्या बाहुलीसोबत संवाद, चित्रवाचन किंवा व्हिडिओ कॉलसारख्या पर्यायांचा अवलंब करा. पण हे सुद्धा फक्त सुरुवातीपुरतं!
मुलांचं वागणं लगेच बदलत नाही. त्यासाठी वेळ आणि सातत्य गरजेचं आहे. एका दिवसात सवय सुटणार नाही, पण सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास नक्कीच फरक पडतो.
मोबाईल पहात जेवणाचे दुष्परिणाम
© मोबाईल पहात जेवताना मूल किती खातं याचं भान राहत नाही. त्यामुळे ओव्हरइटिंग किंवा कमी खाणं या दोन्हीपैकी काहीही होऊ शकतं. अशा प्रकारच्या जेवणामध्ये मुलांचा चावण्याऐवजी गिळण्याकडे कल वाढतो. यामुळे गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
© रमोबाईलवर अवलंबित्व वाढल्यास मुलं चिडचिडी, व्याकूळ आणि एकलकोंडी होऊ शकतात.
© रस्क्रीनकडे सतत बघितल्या मुळे डोळ्यांत कोरडेपणा येतो आणि दृष्टी कमजोर होऊ शकते.
© सतत मोबाईल वापरामुळे मुलं कुटुंबापासून आणि समवयस्कांपासून दूर राहतात. त्यांचं सोशल डेव्हलपमेंट खुंटतं. त्यामुळं मुलांना मोबाईल देऊन जेवण घालणं हा दीर्घकालीन उपाय असू शकत नाही. ही सवय सोडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन एक ‌‘स्क्रीन-फ्री फॅमिली टाईम‌’ तयार करावा. तुमचा वेळ, तुमचं प्रेम, आणि तुमचा संवाद हेच मुलांसाठी सर्वोत्तम टूल्स आहेत!

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …