लेख-समिक्षण

मुलाखतीदरम्यान काय विचारावे?

नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत इंटरव्ह्यू अथवा मुलाखत हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. तुम्हाला कंपनीचे व्यवस्थापक वेगवेगळे प्रश्न विचारून विविध विषयात तुमचे ज्ञान किती आहे हे आजमावून पाहतो. उमेदवारही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो. या प्रश्नांमधून त्या कंपनीमध्ये आपण काम करू शकू की नाही हे कळू शकते. तसेच व्यवस्थापनालाही हा उमेदवार किती पात्रतेचा आहे हे कळू शकते. मुलाखतीच्या वेळी जर उमेदवाराने आपल्या ज्ञानाची आणि व्यक्तिमत्वाची छाप पाडली तर मुलाखत घेणारा प्रभावीत होतो. तो उमेदवाराचा इंटरव्ह्यू घेण्याऐवजी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारायला सुरुवात करतो. अशा वेळी उमेदवार आपल्यावर कोणती जबाबदारी सोपविली जाऊ शकते याची माहिती व्यवस्थापनाला विचारू शकतो.
र्ीइंटरव्ह्यू सुरु झाल्यावर मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती कोणाची निवड करायची हे आपसात चर्चा करून किंवा नेत्रपल्लवीने ठरवून टाकतात. अशा वेळी उमेदवाराला तसे संकेत दिले जातात.
र्ीइंटरव्ह्यूची औपचारिकता पार पडल्यानंतर उमेदवार आपल्याला कोणत्या पदाची जबाबदारी दिली जाणार आहे हे मुलाखत घेणाऱ्यांना विचारू शकतो. त्या पदावर सध्या कोण काम करीत आहे, त्या व्यक्तीला नंतर कोणती जबाबदारी दिली जाणार आहे हे ही विचारता येते. व्यवस्थापनाला स्वत:च्या बुद्धीने चालणारा कर्मचारी हवा आहे का, काही तरी नवे घडवू इच्छिणारा अधिकारी हवा आहे की दिलेले आदेश पाळणारा अधिकारी – कर्मचारी हवा आहे हे अशा प्रश्नांच्या उत्तरांतून आपल्याला कळू शकते. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्पष्टपणे मिळाली तर आपण त्या कंपनीत नोकरी करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतो.
र्ीनियुक्तीनंतर कंपनी तुम्हाला आपल्या बाहेरगावच्या कार्यालयात पाठवणार आहे हेही विचारून घ्या. नवीन गावात जाण्याची वेळ आपल्यावर येणार असेल तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का याचाही विचार करावा.
र्ीतुम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्यांचे मूल्यमापन कसे केले जाइल यासंबंधीही खातरजमा करून घेणे आवश्यक असते. आपल्या जबाबदाऱ्यांशी निगडीत वेतन असेल तर तुम्हाला ती नोकरी स्वीकारताना तसा विचार करावा लागेल. कारण कंपनीने ठरवलेले उद्दिष्ट गाठता आले नाही तर त्याचा थेट परिणाम वेतनावर होऊ शकतो.
र्ी नोकरीत रुजू झाल्यानंतर एक, दोन आणि तीन वर्षांच्या अवधीत कंपनीला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हेही जाणून घ्या. तसेच आपले पद, पगार, भत्ते या विषयी स्पष्ट विचारणा करणे आवश्यक असते.
र्ी आपल्या ऑफर केल्या जाणाऱ्या पदावर कोणत्या पद्धतीने काम करावे लागेल तसेच आपल्याला साहाय्यक म्हणून कोणते कर्मचारी दिले जाणार आहेत याचीही माहिती विचारून घ्या.
र्ी नियुक्तीसंदर्भात तसेच राजीनामा देताना कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे लागते हेही विचारून घ्या. या सर्व गोष्टींची माहिती आपली नोकरी सुरु होण्यापूर्वी आपल्याला असणे गरजेचे असते. कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन (अप्रायजल), वेतनवाढ वगैरे गोष्टीही जाणून घ्या. जर आधीच्या नोकरीत नोटीस पिरीयड मोठा असेल तर तो पूर्ण झाल्या शिवाय आपल्याला मुक्त होता येत नाही. तशी कल्पना आपण कंपनी व्यवस्थापनाला इंटरव्ह्यूवेळी द्यावी.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …