लेख-समिक्षण

मुलाखतासाठीची तयारी

सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे सोपे राहिलेले नाही. तुमच्याकडे उच्च शैक्षणिक पात्रता असली तरी केवळ त्या आधारावर नोकरी मिळण्याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळेच नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा उमेदवारांनी विचार केला पाहिजे. ही कौशल्ये प्रयत्नांद्वारे आत्मसात करता येतात. नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच आपले व्यतिमत्त्व प्रभावी असणे गरजेचे आहे. नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराच्या अंगी कोणते गुण, कौशल्ये असली पाहिजेत यासंबधी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन…
१) मुलाखत देण्यासाठी जाणार्‍या उमेदवारांना आपल्या स्वतःच्या कुवतीबद्दल, पात्रतेबद्दल जाणीव असणे आवश्यक आहे. आपली शैक्षणिक पात्रता, तसेच अन्य कौशल्य याच्या आधारे आपली कुवत जाणून घेता येते.
२) सध्याचा जमाना इंटरनेटचा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला अवगत असलीच पाहिजे. या क्षेत्राच्या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उमेदवाराला अचूक उत्तरे देता आली पाहिजेत.
३) संवाद, संपर्क साधण्याकरिता आपल्याकडे लिहिण्याचे कौशल्य असायला हवे. एखाद्या ग्राहकाशी, लायंटशी संपर्क साधण्याची गरज भासली तर त्याला कोणत्या भाषेत ई-मेल पाठवावा याचे ज्ञान उमेदवाराने करून घेणे आवश्यक असते.
४) ग्लोबलायझेशनच्या जमान्यात अनेक कंपन्या आपल्या व्यवसायाचा विस्तार देशाबाहेर करू इच्छित आहेत. त्यामुळे आपल्याला संबंधित व्यवसायाचे ग्लोबलायझेशनच्या पार्श्वभूमीवर ज्ञान असणे आवश्यक आहे. वृत्तपत्रातील बातम्या, लेख यांचे वाचन करून आपण हे बदल अवगत करू शकतो.
५) मुलाखत घेतली जात असताना उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्याचे व्यतीमत्त्व कसे आहे. तो चारचौघांमध्ये मिळून मिसळून काम करण्यास समर्थ आहे का आदी गोष्टींचा अंदाज मुलाखत घेणार्‍या व्यती घेत असतात. उच्च शैक्षणिक पात्रता असली म्हणजे, नोकरीची शंभर टके हमी असे मानून चालू नका. नोकरी करत असताना आपल्याला विविध स्वभावाच्या लोकांबरोबर काम करावे लागते. अशा वेळी या लोकांशी जुळवून घेण्याची आपली वृत्ती आहे का? याची परीक्षा मुलाखत घेणार्‍या व्यती घेत असतात. म्हणूनच आपले व्यतीमत्त्व चारचौघांमध्ये मिळून मिसळून काम करण्यास योग्य आहे याची खात्री त्या कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या अधिकार्‍याना वाटली पाहिजे. तसा विश्वास आपल्या उत्तरातून मिळण्याकरिता उमेदवारांनी त्या दृष्टीने तयारी करायला हवी.
७) कंपनीत एखादा प्रश्न निर्माण झाल्यास तुम्ही तो प्रश्न कसा सोडवाल यासारखे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांच्या उत्तरातून व्यतिमत्त्वाचे मोजमाप केले जाते. अशा प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे देता येण्यासाठी सदर कंपनीविषयीची, व्यवसायाविषयीची विस्तृत माहिती आपल्याला असणे आवश्यक ठरते. अशा प्रश्नांना पूर्ण विचार करूनच उत्तर देणे अपेक्षित असते. यातून आपली एखाद्या प्रश्नाकडे पाहाण्याची वृत्ती कशी आहे, हे दिसून येते.
८) आपण ज्या क्षेत्रात पदवी घेतलेली आहे त्यातील वेगवेगळ्या विषयांचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तयारी करून गेले पाहिजे. या विषयासंदर्भातील प्रश्नांची बिनचूक उत्तरे आपल्याला द्यायला हवीत.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …