नुकताच प्रदर्शित झालेला ‘महावतार नरसिम्हा’ या अॅनिमेटेड चित्रपटाने आतापर्यंत ३२० कोटींचा गल्ला जमवला आहे. एकट्या भारतातून २६८ कोटींची कमाईने चित्रपटाने केली. यात थ्रीडीची कमाई जोडल्यास हा आकडा २९६ कोटींच्या घरात जातो.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी सुरुवात काहीशी रडतखडत झाली. परंतु उत्तरोत्तर चित्रपटाने चांगलीच गती मिवली. खास करुन शाळाशाळांंतून या चित्रपटाचा प्रचार झाला. दाक्षिणात्य प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच हात दिला. तेलूगू पट्ट्यातून चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली. कन्नड भाषेत या चित्रपटाने १०.७५ कोटींची कमाई केली.
आतापर्यंत एकाही भारतीय अॅनिमेटेड चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला गाठला नव्हता. ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाने ३०० कोटींचा पल्ला गाठला. अॅनिमेटेड चित्रपट पाश्चात देशांत खास करुन यशस्वी ठरतात. भारतीय बाजारपेठ आतापर्यंत त्यासाठी तितकीशी अनुकूल नव्हती. परंतु ’महावतार नरसिम्हा’ हे गृहितक खोडून काढले. – जगदीश काळे
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र