लेख-समिक्षण

बोले तो एकदम झकास

सध्या शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण काम करणार असल्याची बातमी झळकली. आता या चित्रपटात अनिल कपूरही काम करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
सिध्दार्थ आनंदचा ‘किंग’ अनेक अर्थाने वेगळा चित्रपट ठरणार आहे. यात शाहरुख सोबत त्याची कन्या सुहानासुध्दा दिसणार आहे. अभिषेक बच्चन आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अरशद वारसी आणि अभय वर्मा हेसुध्दा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका निभावणार आहे. पुढील आठवड्यात मुंबईत चित्रपटाच्या चित्रीकरणाचा नारळ फोडला जाणार आहे. यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. अनिल कपूरची ‘किंग’ला तयार करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजेच ‘किंग’चा गुरु अनिल कपूर असणार आहे. ऑटोबर किंवा डिसेंबर २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करायचा आहे. त्यामुळे १०० दिवसांच्या चित्रीकरणात हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. काही चित्रीकरण परदेशातही केले जाणार आहे. खास करुन युरोपियन राष्ट्रात किंगचे चित्र – अपर्णा देवकर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …