सध्या तेलुगू चित्रपट बॉस ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. एकापेक्षा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि प्रेक्षक त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. दमदार कथा आणि प्रभावी अभिनय यामुळे लोक थिएटरमध्ये धावत आहेत. या दिवसांत लिटिल हार्टस् हा चित्रपट बॉस ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. ५ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या छोट्या बजेटच्या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. सकारात्मक प्रतिक्रिया यामुळे लोक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत.
कमी बजेटमध्ये मोठा कमाल
लिटिल हाटर्स चित्रपटाने कमी खर्चात मोठा पराक्रम केला आहे. ज्या वेळी १०० ते ५०० कोटींचे चित्रपट बॉस ऑफिसवर अपयशी ठरत आहेत, त्याच वेळी दक्षिणेतील छोटे चित्रपट चमत्कार घडवत आहेत. या चित्रपटाचे बजेट साधारण ३ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉस ऑफिसवर जवळपास ३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच बजेटच्या दहा पट कमाई करून या चित्रपटाने सिद्ध केले आहे की कथा आणि अभिनय दमदार असतील तर बाकी सर्व दुय्यम ठरते.
सध्या तेलुगू सिनेमात कुठलाही मोठा चित्रपट येत नाही, त्यामुळे ‘लिटिल हाटर्स’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ट्रेंड बराच काळ टिकणार आहे. तेलुगू सिनेमातील पुढचा मोठा चित्रपट म्हणजे पवन कल्याण यांचा ’दे कॉल हिम ओजी’. तोपर्यंत ‘लिटिल हाटर्स’चा प्रााव कमी होण्याची शयता नाही. या चित्रपटाचे कथानक एका मुलाच्या आजूबाजूला फिरते, जो एंट्रन्स परीक्षेत नापास होतो आणि मग कोचिंग लासला जातो. तिथे त्याची एका मुलीशी भेट होते. सुरुवातीला ती त्याला नाकारते, पण तो आपले मन जिंकण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई मार्तंड यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत मौली तनुज प्रशांत, शिवानी नगरम आणि राजीव कनकतला आहेत. – विनिता शाह
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र