लेख-समिक्षण

फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव

नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्‍या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव
कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा अशा प्रकारे महत्त्वाचे कॉल्स मिस करत असाल, तर एक फीचर तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरेल. एकदा हा फीचर ऑन केला की, कॉल आल्यानंतर कोणाचा कॉल येत आहे हे फोन स्वतःच सांगेल ! हे सिक्रेट फीचर इनेबल केल्यानंतर फोनमध्ये कॉल आल्यावर रिंगटोनऐवजी कॉल करणार्‍या व्यक्तीचे नाव उच्चारले जाईल. त्यामुळे, महत्त्वाचे फोन कॉल्स मिस होण्याची शक्यताच राहणार नाही. हे फीचर फोनमध्ये नसून ते ट्रू कॉलर या अ‍ॅपद्वारे मिळवता येतो.
आजच्या काळात बहुतेक स्मार्टफोन वापरकर्त्यांकडे हे अ‍ॅप असतेच. जर तुमच्याकडेही ट्रूकॉलर अ‍ॅप असेल, तर या फिचरचा उपयोग करू शकता.
सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ट्रूकॉलर अ‍ॅप उघडा. नंतर, वरच्या उजव्या कोपर्‍यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर लिक करा. आता वरच्या बाजूस असलेल्या सेटिंग्जच्या चिन्हावर लिक करा. येथे तुम्हाला कॉल्स या पर्यायावर लिक करा. खाली स्क्रोल केल्यानंतर फोन कॉल्स या भागात तुम्हाला अनाऊन्स फोल कॉल्स असा पर्याय दिसेल. फक्त या पर्यायासमोर असलेला टॉगल ऑन करा. एकदा हा टॉगल ऑन केल्यानंतर कुणाचाही कॉल आला तरी फोन स्वतःच बोलून त्याचे नाव सांगेल. हे फिचर व्यस्त वेळेत, गाडी चालवत असताना किंवा हात मोकळे नसताना अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे कोणताही महत्त्वाचा कॉल चुकणार नाही आणि तुम्ही वेळेवर प्रतिसाद देऊ शकाल.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …