फूड प्रोसेसर हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा उपकरण आहे. त्याची स्वच्छता केल्यास त्याचे आयुष्य वाढते आणि अन्न सुरक्षित राहते. खालील टिप्स फूड प्रोसेसर स्वच्छ करण्यास मदत करतील.
प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करा ः फूड प्रोसेसर वापरल्यानंतर लगेच स्वच्छ केल्यास अन्नाच्या होणारा डाग, दुर्गंधी टाळता येते.
भाग वेगळे करून धुवा ः फूड प्रोसेसरचे ब्लेड, झाकण, बाऊल आणि इतर सुटे भाग वेगळे करा. यानंतर गरम पाण्यात सौम्य डिशवॉशिंग लिक्विड मिसळून स्वच्छ करा.
ब्लेडची विशेष काळजी घ्या ः ब्लेड अत्यंत तीक्ष्ण असतात, त्यामुळे ते स्वच्छ करताना काळजी घ्या. ब्लेड लागलीच कोरडे करून ठेवले तर त्याला गंज येणार नाही.
दुर्गंधी आणि डाग हटवा ः फूड प्रोसेसरमध्ये अन्नपदार्थांचा, भाज्यांचा वास टिकू नये म्हणून एक चमचा बेकिंग सोडा आणि कोमट पाणी मिसळून स्वच्छ करा. लिंबाचा रस किंवा व्हिनेगरने धुतल्यास डाग आणि वास दूर होतो.
मोटर आणि बेस स्वच्छ करा ः इलेक्ट्रिक फूड प्रोसेसर असल्यास मोटर युनिटला कधीही पाण्यात बुडवू नका. ओलसर कापडाने मोटरचा भाग स्वच्छ करून कोरडा करा.
नीट कोरडे करून साठवा ः सर्व भाग कोरडे करून ठेवल्यास बुरशी आणि दुर्गंधी रोखता येते. फूड प्रोसेसर हवेशीर ठिकाणी ठेवा.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र