लेख-समिक्षण

प्रामाणिकपणाचा असाही आदर्श

सिंगापूरमधील एका मोठ्या घरात सिसिल ब्राउन नावाचे इंग्रज डॉटर एकटे राहत होते. त्यांनी अनेक प्राणी आणि पक्षी पाळले होते आणि त्यांच्यावर ते लहान मुलांसारखे प्रेम करत होते. त्यांच्या शेजारीच मिग नावाचा चौदा वर्षांचा गरीब मुलगा एकटा राहत होता. तो डॉटर ब्राउन यांचे कपडे धुत असे आणि इस्त्री करत असे. दरम्यान इंग्रज आणि जपानी यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धाच्या काळात मिग जखमी झाला आणि तो डॉटर ब्राउन यांच्याकडे आला. डॉटरांनी त्याच्या जखमा स्वच्छ करून पट्ट्या बांधल्या आणि औषध दिले. त्याचबरोबर त्यांनी मिगला आपले काही कपडे दिले आणि सांगितले की धुऊन आणि इस्त्री करून परत द्यावेत.
दोन दिवसांनीच जपान्यांनी सिंगापूरवर कब्जा केला. इतर लोकांसोबतच मिगलाही कैद करून तुरुंगात टाकले गेले. जपानी सैन्याने डॉटर ब्राउन यांनाही पकडून तुरुंगात डांबले. तीन वर्षांनंतर सिंगापूर मुक्त झाला आणि सर्व कैद्यांना सोडण्यात आले. डॉटर ब्राउन आणि मिगही सुटून आपल्या-आपल्या घरी परतले.
मिग घरी पोहोचताच सर्वप्रथम डॉटर ब्राउन यांचे कपडे शोधू लागला. त्याने ते धुऊन, वाळवून, इस्त्री केली आणि घेऊन डॉटर ब्राउन यांच्या घरी गेला. कपडे देताना तो म्हणाला. सर, यावेळी खूप उशीर झाला. क्षमा करा. मला जपान्यांनी पकडून तुरुंगात टाकले होते. आठवतंय ना, तीन वर्षांपूर्वी तुम्ही हे कपडे मला धुण्यासाठी दिले होते? मिगची प्रामाणिकपणा आणि कामाप्रती निष्ठा पाहून डॉटरांच्या डोळ्यांत पाणी आले. ते म्हणाले, अरे बाळा, मीही कालच तुरुंगातून सुटलो आहे. खूप हाल झाले माझे; पण तुझी ईमानदारी पाहून माझे सगळे दुःख विसरून गेलो. मिग, आता तू अनाथ नाहीस. तू माझ्यासोबत राहशील आणि कपडे धुणार नाहीस. उद्यापासून तू शाळेत जाशील. हीच तुझ्या प्रामाणिकपणाचे खरे पारितोषिक आहे. मिगच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.
प्रामाणिकपणाचे परिणाम कुठल्यातरी स्वरुपात समोर येतातच हे वरील उदाहरणावरुन स्ष्ट होत नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …