लेख-समिक्षण

पायमोजांची स्वच्छता करताना…

पायमोजे हे केवळ कार्यालयीन शिष्टाचारांचा किंवा फॅशनचा भाग नसून पायांची त्वचा चांगली राहण्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. सॉक्स किंवा पायमोजांशिवाय बूट वापरण्याची फॅशन बरेचदा दिसून येत असली तरी ज्याला कॉपोरेट एटिकेटस् म्हणतात त्याच्याशी ही बाब विसंगत मानली जाते. तसेच बुटांचा दर्जा चांगला नसेल तर पायमोजांशिवाय त्यांचा वापर केल्यामुळे पायांच्या त्वचेला अ‍ॅलर्जी, पुरळ उठणे, बुट लागणे यांसारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळं पायमोजे हे वापरायलाच हवेत. त्यांचा वापर जितका महत्त्वाचा तितकीच त्यांची स्वच्छताही ! मळलेले पायमोजे संपूर्ण पोषाखाची शान घालवू शकतात. तसेच घामट्ट सॉक्सची दुर्गंधी संपूर्ण वातावरण बिघडवणारी ठरते. यामुळे तुमची इमेजही खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं पायमोजे नियमित धुणे महत्त्वाचे असते. वॉशिंग मशिनमध्ये ते सहजगत्या स्वच्छ होतात आणि वाळतातही चटकन. पण वॉशिंग मशिन नसल्यास पायमोजे धुताना, विशेषतः पांढरे सॉक्स धुताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. मळलेले सॉक्स स्वच्छ करण्यासाठी थोड्याशा कोमट पाण्यात आधी ते भिजत ठेवा. या पाण्यात थोडासा डिटर्जंट आणि लिंबाचा रस मिसळा. साधारण तासाभराने ते धुवायला घ्या. सगळा मळ निघून गेलेला दिसेल. दुसरा पर्याय म्हणजे, कोमट पाणी आणि ब्लिचिंग पावडर टाकून त्यामध्ये पायमोजे भिजत ठेवा. तासाभरानंतर हळू हळू चोळा आणि पाण्याने नीट धुवा. ते स्वच्छ झालेले दिसतील. तिसरा पर्याय व्हिनेगरचा. व्हिनेगरच्या मदतीने अगदी घाणेरडे मोजेही चकचकीत दिसू लागतात. यासाठी हलके गरम असणार्‍या पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि त्यात डिटर्जंट टाकून सॉक्स भिजत ठेवा. काही वेळाने थंड पाण्याने स्क्रब करून मोजे स्वच्छ करा. असे केल्याने मोजे स्वच्छ होतील, तसेच त्यावरील घाणीचे डाग निघून जातील. पांढरे मोजे नव्यासारखे चांगले दिसायचे असतील तर ते नेपिसन नॉन बायोलॉजिकल स्टेन रिमूव्हरने स्वच्छ करुन मग ते सौम्य डिटर्जंटने धुवा.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …