राजगड तालुक्यातील पानशेत रोडवरील रुळे गावचा शिवांश सुभाष जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवित देशात 26 वे स्थान मिळविले. राजगड ( वेल्हे ) तालुक्यातील पानशेत रस्त्यावरील रुळे हे त्याचे मूळ गाव सध्या तो आई-वडिलांसह वडगाव बुद्रुक मध्ये वास्तव्यास आहे.
विशेष म्हणजे त्याचे वडील शेती करतात तर आई शिवणकाम करते आणि बहीण वकील आहे. या अगोदर त्याने एनडीएच्या दोन परीक्षा दिल्या होत्या मात्र त्यात त्याला यश आले नाही. खचून न जाता त्याने आयएएसचा अभ्यास सुरू केला व मेहनत चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तो यशस्वी झाला आणि आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिवांशने कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण डीएसके स्कूल येथे झाले बारावीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगरला झाले. आयएएस अधिकारी होण्याची त्याची प्रबळ इच्छा त्यादृष्टीने त्याने प्रचंड अभ्यास केला आणि तो त्यात पहिल्या प्रयत्नातच यशस्वी झाल्याचे ऐकून समाधान वाटते. आम्हाला शिवांश व वकील झालेले मुलगी हिचा खूप अभिमान आहे असे सांगताना आई-वडिलांचे डोळे आनंदाशुंनी पाणवले होते.
लहानपणापासूनच काहीतरी चांगलं करण्याची जिद्द मनात होती त्यानुसार मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महागडे क्लास न लावता नियोजन बद्ध अभ्यासावर लक्ष केंद्रित केले स्वतःच नोट्स तयार केल्या. गावाकडील परिस्थितीची जाणीव असल्यामुळे लहानवयापासूनच समाजसेवेची आवड होती त्यामुळे नोकरी करायची तर अशी की ज्यातून समाज्याच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्न करता येतील.
त्या दृष्टीने विचार करीत असतानाच आयएएसचा अभ्यास सुरू केला त्याचे योग्य नियोजन केले त्यानुसार परीक्षेला सामोरे गेलो आणि पहिल्या प्रयत्नात यश मिळाले याचा खूप आनंद वाटतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात उतरणार असाल तर त्याची योग्य तयारी असली पाहिजे निश्चित यश मिळते हे मला या परीक्षेतून कळाले आहे. त्यामुळे मी इतर स्पर्धा परीक्षा करणार्या मित्रांना एकच सांगेन की नियोजनबद्ध तयारी करा यश हमखास मिळेल,असे शिवांश सांगतो.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र