एनईईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिशम, योग्य नियोजन आणि सराव महत्त्वाचा असतो. सतत अभ्यास, पुनरावलोकन आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केल्यास निश्चितच यश मिळेल. वेळेचे नियोजन, अचूक रणनीती आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीने एनईईटी परीक्षेत उत्तम कामगिरी करता येईल.
मॉक टेस्ट द्या: ‘नीट’सारख्या परीक्षेसाठी वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा आणि गती वाढवा.
ओएमआर भरायची सवय लावा: परीक्षेत ओएमआर भरताना वेळेचा योग्य वापर करा. चुकीच्या उत्तरांमुळे निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी काळजी घ्या.
सोपे प्रश्न आधी सोडवा: सर्वप्रथम सोपे प्रश्न सोडवून आत्मविश्वास वाढवा, मग कठीण प्रश्नांकडे वळा.
वेळेचे योग्य नियोजन करा:
जीवशास्त्र ः 40 मिनिटे
रसायनशास्त्र ः 35-40 मिनिटे
भौतिकशास्त्र ः 45 मिनिटे
उरलेल्या वेळेत पुनरावलोकन करा.
परीक्षेपूर्वीच्या शेवटच्या दिवसांची रणनीती:
* नवीन काहीही शिकण्याचा प्रयत्न करू नका.
* केवळ तयार केलेल्या नोट्स आणि महत्त्वाचे मुद्दे पाहा.
* पूर्ण झोप घ्या आणि परीक्षेपूर्वी मानसिक शांतता ठेवा.
* अभ्यासाच्या वेळेतच परीक्षेचा सराव करा, जेणेकरून तुमची बॉडी क्लॉक त्यास अनुकूल होईल.
मानसिक तयारी आणि आरोग्य:
* सकारात्मक राहा: अभ्यासादरम्यान आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
* योग्य आहार आणि व्यायाम: आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा.
* ताण-तणाव कमी करा: मेडिटेशन, संगीत ऐकणे किंवा खेळ खेळणे याने तणाव दूर होतो.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र