लेख-समिक्षण

ध्येयप्राप्तीसाठी डार्विनचा संदेश

कोणतीही मोठी कलाकृती उभी राहिली किंवा आकाराला आली की लोक तिची प्रशंसा करतात. त्यातील गहन अर्थ शोधतात, तिच्या भव्यतेला सलाम करतात. पण बहुतेकदा त्या कलाकृतीच्या निर्मिती प्रक्रियच्या तळाशी जाऊन वेध घेत नाहीत. खरे म्हणजे तो वेध घेतला
असता अत्यंत मोलाची सूत्रे आपल्याला मिळतात. चार्ल्स डार्विन यांच्या महान ग्रंथाची कहाणी अशीच मौलिक विचार देणारी आहे.
चार्ल्स डार्विन यांनी आपल्या महान ग्रंथ ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज लिहिण्यास तब्बल १७ वर्षे घेतली. एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांनी लेखन सातत्याने कसे सुरू ठेवले, यामागचे एक मोठे कारण म्हणजे त्यांनी स्वतःसाठी ठरवलेली आणि पाळलेली दिनचर्या. डार्विन यांनी लेखनासाठी पुरेसा वेळ राखून ठेवला होता, परंतु त्याचबरोबर व्यायाम, आपल्या कुटुंबीयांबरोबर आणि कुत्र्यासोबत वेळ घालवणे, तसेच बागकाम करणे यांसारख्या इतर गोष्टींसाठीही निश्चित वेळ दिला होता.
‘द गार्डियन’ मधील त्यांच्या दिनक्रमावरील एका लेखानुसार, डार्विन यांनी लेखन करत असताना घरगुती समाधान (डोमेस्टिक कम्फर्ट) या गोष्टीला सर्वांत मोठे प्राधान्य दिले होते.
डार्विन यांना सातत्य राखण्यास आणखी एक गोष्ट मदत करत होती ‡ती म्हणजे त्यांच्या विषयाशी असलेले भावनिक नाते. त्यांनी एकदा म्हटले होते, अनेक प्रकारच्या वनस्पतींनी झाकलेल्या एका गुंतागुंतीच्या किनार्‍याचे चिंतन करणे किती मनोरंजक आहे. झुडपांवर पक्ष्यांचे गाणे, विविध प्रकारचे कीटक उडताना दिसतात, ओलसर जमिनीत सरपटणारे जंतू ‡आणि हे सर्व वेगवेगळ्या स्वरूपांचे सजीव, जे एकमेकांवर अवलंबून असून इतया गुंतागुंतीच्या प्रकारे एकत्र राहतात, हे सारे आपल्या आजूबाजूला कार्यरत असलेल्या नैसर्गिक नियमांमुळे निर्माण झाले आहेत, हे किती अद्भुत आहे.
या सर्वातून मिळणारा संदेश असा की, अतिवेगाने लेखन केल्याने नेहमीच उत्तम परिणाम मिळतात असे नाही. डार्विन स्वतः म्हणत असत की, प्रत्येक वाय लिहिण्याची प्रक्रिया फार कठीण आणि हळू असते. पण…
आपल्या वैयक्तिक जीवनाला प्राधान्य देत, वास्तववादी वेळापत्रक ठेऊन त्यांनी शेवटी उत्क्रांतीवरचा सर्वकालीन महत्वाचा ग्रंथ लिहिला जो आज जगातील विज्ञानाचा पाया मानला जातो.
आपला ध्येयवेडेपणा वास्तववादी वेळापत्रकाला धरुन असावा ही बाब डार्विन यांच्या वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …