स्टायलिश दिसण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर दागिन्यांवरही तितकंच लक्ष देणे गरजेचे असते. दागिन्यांचा साज चढवताना ज्वेलरी लेयरिंग हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. अगदी साध्या कपड्यांनाही ही स्टाइल एक नवीन ट्विस्ट देऊन, तुमच्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवते. पण हे लेयरींग अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. एस्टेटमेंट पीस निवडा ः लेयरिंग करताना एक असा दागिना निवडा जो सर्वांचं लक्ष वेधून घेईल. उदा. मोठा पेंडंट असलेला नेकलेस, चंकी चोकर किंवा एखादी बोल्ड रिंग. याच्या आजूबाजूला हलया, मिनिमल ज्वेलरी पीसेस घालावेत. यामुळे बॅलन्स साधला जातो आणि हेवी लूक झाल्याचा भासही होत नाही. उदाहरणार्थ, लांब लॉकेट असल्यास त्याच्यासोबत मिड-लेंथ चेन घालणं उत्तम ठरतं.
लांबीसह प्रयोग करा ः सर्व दागिने सारख्या लांबीचे नसावेत. विविध लांबीचे नेकपीस एकत्र स्टाइल करा. उदा. चोकर + मिड लेंथ + लॉन्ग पेंडंट. यामुळे तुमच्या लुकमध्ये डायमेंशन आणि डेप्थ येतो. तसेच ते एकत्र अडकतही नाहीत. थोडं स्पेसिंग ठेवा म्हणजे लुक लटर वाटणार नाही.
रिंग्ससह लेयरिंग करा ः रिंग्स देखील लेयर करता येतात. काही बोटांमध्ये मोठ्या-पातळ बँड्स यांचे मिश्रण करा. एका बोटात २-३ रिंग्स घातल्यास एखादे बोट रिकामे सोडा. यामुळे हात भरलेला वाटणार नाही आणि एक स्टाइल स्टेटमेंटही तयार होईल.
अतिरेक नको ः एकाच वेळी फारशा चंकी किंवा फॅन्सी ज्वेलरी घालू नका. त्यामुळे लुक गोंधळलेला किंवा ओव्हरलोडेड वाटतो. फक्त एका स्टेटमेंट पीससह दोन मिनिमल ज्वेलरी आयटम्स वापरल्यास तुमचा लुक एलीगंट आणि बॅलन्स्ड दिसतो. लक्षात घ्या, ज्वेलरी लेयरिंग ही केवळ फॅशन नसून कला आहे. योग्य संतुलन, लेंथ आणि कॉम्बिनेशन वापरून तुम्ही अगदी साध्या पोशाखालाही लासी आणि स्टनिंग बनवू शकता.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र