कोणत्याही क्षेत्रात काही करून दाखवायचं असेल तर त्यात आपला कस लावावा लागतो. आजकाल आयटी क्षेत्राची धूम आहे खरी पण त्यातही फक्त प्रोग्रॅमिंगला महत्व दिलं जातं पण तयार केलेले प्रोग्रॅम नीट सुरू राहतील की नाही याची काळजी करणारंही कोणीतरी लागतं. थोडक्यात तयार सॉफ्यवेअरला टेस्ट करायलाही तेवढंच डोकं लागतं काय? म्हणूनच आजकाल सॉफ्टवेअर टेस्टिंगलाही फार महत्व प्राप्त झालं आहे. बरं यासाठी तुम्हाला आयटीतले खूप महागडे कोर्स करावे लागतील असंही नाही. मग नक्की करायचं काय?
सॉफ्टवेअर टेस्टिंग क्षेत्रात यायचं असेल तर अनेक प्रकारचे कोर्स करता येतात. देशातील अनेक प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग मधील डिप्लोमा आणि डीग्री कोर्सेस करता येतात. या कोर्सेसचा कालावधी कमी असतो. 6 महिने ते जास्तीत जास्त एक वर्षाचा अवधी अशा अभ्यासक्रमांसाठी ठेवला जातो. त्यानंतर तुम्हाला त्यात काही ॲडव्हान्स कोर्स करता येतात. जसे की एडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर टेस्टिंग,डिप्लोमा इन क्वालिटी मॅनेजमेंट वगैरे. बहुतेक शिक्षणसंस्थेत या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी कठीण प्रवेशपरिक्षांमधून पार पडावं लागतं. त्यासाठी किमान पात्रता बीएससी, एमएससी, बीई, बीटेक,एमटेक अशी असावी लागते. या क्षेत्रात येण्यासाठी इ्रंग्रजीवर प्रभुत्व असणं मात्र गरजेचं आहे.
या क्षेत्रात प्रवेशासाठी पात्रता आवश्यक आहेच पण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणखीही काही गोष्टींची गरज आहे. नवीन सॉफ्टवेअर विषयी माहिती असणे, ज्यांना लवकर एखादी गोष्ट आत्मदात करता येते आणि जे दुसऱ्याला ती शिकवू शकतात अशा लोकांसाठी हे क्षेत्र एक वरदान आहे. सामान्यत: सॉफ्टवेअर टेस्टिंगचं काम एका टीममध्ये चालतं. सगळ्यांचं काम एकमेकांशी निगडीत असतं. त्यामुळे ज्यांच्याकडे लीडरशीप असेल ते अशा ठिकाणी पुढे जाऊ शकतात. त्यामुळे अंगच्या काही गुणांचाही पात्रतेमध्ये समावेश करणं गरजेचं आहे. या क्षेत्रातल्या तज्ञांची मागणी वाढतच आहे.
चांगल्या सॉफ्टवेअर टेस्टिंग करू शकणाऱ्या लोकांच्या शोधात चांगल्या कंपन्या सतत असतात. आजकाल अनेक सॉफ्टवेअर कंपन्या चांगल्या सॉफ्टवेअर टेस्टरच्या शोधात आहेत. त्यात सत्यम, विप्रो, इन्फोसिस,एम्फसिस अशा काही कंपन्यांची नावं घेता येतील. त्यांच्या अपेक्षांना उतरणाऱ्या लोकांना ते चांगलं पॅकेज ऑफर करतात. विदेशातही सॉफ्टवेअर टेस्टिंगला फार मागणी आहे. तिकडच्या कंपन्याही भारतातील या क्षेत्रातील जाणकार लोक घेण्यास उत्सुक असतात. सर्व प्रमुख आय.टी कंपन्या कॅम्पसमधून उमेदवारांची नियुक्ती करत असतात. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी भविष्य उज्वल आहे हे वेगळं सांगायला नको. हा अभ्यासक्रम कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून करता येतो. तेथे प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या येतात याची पडताळणी प्रवेश घेण्यापूर्वी जरूर करावी.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र