मित्रांबरोबर घालवलेले क्षण आपल्याला उपयोगी पडतात. तरुणपणात आपल्याला मोठा मित्रपरिवार असतो. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मित्र जोडले जातात. खेळ, सांस्कृतिक उपक्रम याद्वारे आपला मित्र परिवार वाढत जातो. मित्र परिवार वाढल्याने आपला जीवनविषयक दृष्टीकोन व्यापक होत असतो. याचे कारण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र असल्याने त्यांच्या अनुभवाद्वारे आपल्याला जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पहाण्याची नजर मिळते. या मित्रांबरोबर आपण खर्च केलेला वेळ ही एक प्रकारची गुंतवणूकच असते. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना आपला मित्र परिवार वाढविण्याकडे लक्ष द्या.
या संदर्भात करण्यात आलेल्या पाहाण्यांमध्ये असे दिसले आहे की, ज्या तरुणांना किंवा ज्या माणसांना भरपूर मित्र असतात त्यांच्या करिअरला मित्र परिवारांमुळे मोठी मदत झाली आहे. मित्र मैत्रिणींजवळ आपण वेगवेगळ्या भावना मोकळेपणाने व्यत करत असतो. मात्र एकाकीपणात आपल्या भावना व्यत करण्याचा कोणताच मार्ग नसतो. त्याचा परिणाम अनेक भावना आपल्या मनात तशाच दाबून राहिल्या जातात. परिणामी एकाकीपणा, एकटेपणा वाढीस लागतो. अशा व्यती हुशार असतात, करिअरमध्ये प्रगतीही करतात; मात्र त्यांना कोणीच मित्र नसल्याने जीवनाचा आनंद लुटणे शय होत नाही. मित्रांबरोबर पर्यटन, ट्रेकींग अशा प्रकारांद्वारे खर्च केलेला वेळ हा आपल्या आयुष्यातील आनंदाचा मोठा ठेवा असतो.
मित्र जोडण्यासाठी आपल्याला विशेष काही करावे लागत नाही. आपण स्वत:हून पुढाकार घेऊन कॉलेजमध्ये असताना वर्गातील सहकार्यांशी ओळख करून घेतली तर आपले मित्र वाढत जातात. कॉलेज संपल्यानंतर उद्योग व्यवसायात गुंतल्याने आपण कुटुंंबियांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. मात्र कुटुंंबियांबरोबर घरगुती समारंभांमध्ये घालवले क्षण हे मनाला प्रसन्नता देतात. या क्षणांमुळे आपले मानिसक आरोग्य सुदृढ होण्यात होत असतो. सहलीला वा पिकनिकला गेल्यावर आपल्या कुटुंबियांबरोबर एकाच टेबलवर जेवायला बसा. आपल्या मुलांना एखादा छंद असेल तर त्यासाठी करता येईल तेवढी मदत करा.आपल्या मुलांशी गप्पा मारा. तु आज दिवसभरात काय केलेस. उद्या काय करणार आहेस. परीक्षा केव्हा आहे आदी विषयांवर मुलांशी बोलल्याने अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते.
केअरन चौदा वर्षांचा असताना परवाना नसल्यामुळे त्याची आई त्याला स्पेसएसच्या ऑफिसला सोडायला जात असे. पण आज तो मॅनहॅटनमध्ये राहून फक्त दहा मिनिटे चालत कामावर जातो आणि आपल्या स्वावलंबी आयुष्याचा आनंद घेतो. एवढ्या लहान वयात त्याने ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत त्या कल्पनेपलीकडच्या आहेत. केअरन क्वाझीने आधीच असे आयुष्य अनुभवले आहे जे बहुतेकांसाठी दुर्मिळ आणि स्वप्नवत वाटते. त्याचा प्रवास अजून सुरू आहे.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र