कोविड-१९ हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्णसंख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच, हवामान आणि ऋतूंचाही कोविडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. २०२० आणि २१ मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररित्या सांगितले होते की, आपल्याला कोविडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोविडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार वेळोवेळी समोर येतील. पण २०२० च्या तुलनेत ते कमी घटक असतील. सध्या भारतामध्ये हेच होत आहे. २०२० आणि २०२१ च्या तुलनेत कोविडचा धोका काहीसा कमी असला तरी असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. विशेषतः उच्च-जोखीम गटांनी अधिक काळजी घेणे आणि संसर्ग टाळणे हेच सुरक्षिततेचे सर्वोत्तम मार्ग आहेत.
कोविड-१९ हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्णसंख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच, हवामान आणि ऋतूंचाही कोविडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. २०२० आणि २१ मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररित्या सांगितले होते की, आपल्याला कोविडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोविडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार वेळोवेळी समोर येतील. पण २०२० च्या तुलनेत ते कमी घटक असतील. सध्या भारतामध्ये हेच होत आहे.
कोविडचा विषाणू हा फ्लूच्या विषाणूसारखा वतर्णूक करत आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये ऋतुमानानुसार आणि स्थानिक वातावरणीय परिस्थिनुसार बदल होत असून वेळोवेळी त्याच्या प्रसार वाढताना दिसून येतोय. युरोपियन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये थंडीच्या दिवसात फ्लूच्या आजाराची रुग्णसंख्या वाढते, तर भारतासारख्या आशियाई देशांमध्ये सहसा उन्हाळ्याच्या महिन्यात पावसापूर्वी रुग्णसंख्या वाढलेली दिसते. हाच पॅटर्न कोविड विषाणूच्या प्रसारात पण दिसून येत आहे. भारतात गेल्या वर्षी २०२४ मध्ये देखील याच काळामध्ये कोविड रुग्णसंख्या वाढली होती आणि जून-जुलै मध्ये कमी झाली होती.
भारतात मार्च ते मे २०२४ मध्ये कोविड रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ झाली होती. काही राज्यांमध्ये (महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, तामिळनाडू) आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला होता. तेव्हासुद्धा नवीन उपप्रकारांपैकी जेएन १ आणि त्याचे उपप्रकार सक्रिय होते. पुढे जून-जुलैमध्ये हवामानात बदल (मान्सूनची सुरुवात), लसीकरणाची वाढ आणि नैसर्गिक प्रतिकारशक्तीमुळे रुग्णसंख्या पुन्हा घटली होती. ऋतुनुसार बदलाचे निरीक्षण केले तर भारतात उन्हाळा (मार्च-मे) हा २०२० पासून कोविड रुग्णसंख्येच्या वाढीचा कालखंड दिसून येतो. गरम हवामान असूनही लोक घरात बंद राहतात, वातानुकूलित जागेत असतात, ही बाब विषाणूंच्या संक्रमणासाठी अनुकूल ठरते. तसेच शालेय परीक्षा, सुट्टयांमुळे घडणारा प्रवास यामुळे संसर्गाची साखळी निर्माण होते.
पावसाळ्याच्या सुरुवतीनंतर (जून-जुलै) मध्ये हवामानातील आर्द्रता, संसर्गाचे नैसर्गिक चक्र, आणि पूर्वी संक्रमित झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती यामुळे संसर्ग कमी होतो. त्यामुळे जर हाच ऋतूवार ट्रेंड पुढेही कायम राहिला, तर भारतात दरवर्षी फेब्रुवारी-मे दरम्यान दक्षता घेणं अत्यावश्यक ठरेल आणि यावरच सरकारी आरोग्यविषयक धोरणात्मक बदल करावे लागतील. — डॉ. नानासाहेब थोरात, रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन लंडन
जागतिक आरोग्य संघटना काय सांगते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या २८ मेच्या परिपत्रकानुसार एनबी १.८.१ हा ओमायक्रॉनच्या जेएन.१ या उपप्रकाराचा एक नवीन उपप्रकार तयार झाला असून जो जानेवारी २०२५ मध्ये प्रथम ओळखला गेला होता. जगभरात ४० हून अधिक देशांमध्ये या उपप्रकाराचे प्रसार झाले आहेत.
उपप्रकारांचा उच्छाद
ज्या डेल्टा व्हेरिएंटमुळे मार्च २०२१ ते जुलै २०२१ मध्ये भारतात कोविडची दुसरी लाट आली होती त्याच्या तुलनेत सध्या दिसत असलेले अनेक नवे उपप्रकार उदा. ओमिक्रॉन आणि त्याचे बीए.२, एक्सबीबी, जेएन.१, केपी.२ हे उपप्रकार साधारणतः सौम्य लक्षणे देणारे आणि अधिक सहजपणे पसरणारे असल्याचे आढळले आहे. जरी याची सौम्य लक्षणे असली तरी हे उपप्रकार जलद पसरत असल्याने एकाच वेळी अनेक लोक बाधित होतात, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. उच्च-जोखीम गटांमध्ये (वृद्ध, आजारी, लसीकरण न झालेले, मधुमेही रुग्ण) या सौम्य उपप्रकारांचाही परिणाम गंभीर ठरू शकतो. त्याचबरोबर काही उपप्रकार जसे की केपी.२ हे पूर्वीच्या लाटांमध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवत आहेत.
सध्या दिसत असलेला कोव्हिडचा प्रसार हा सौम्य सर्दी, घसा खवखव, थकवा, क्वचित ताप इथपर्यंतच दिसून येत आहे. या वाढीमागे एनबी.१.८.१ आणि एलएफ.७ या नवीन उपप्रकारांचा वेगाने होणार प्रसार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एनबी.१.८.१ उपप्रकारात ६ नवीन म्युटेशन्स आढळून आली असून, ज्यामुळे हा विषाणू एसीई रिसेप्टरला अधिक सहजपणे चिकटतो आणि शरीरातील प्रतिकारशक्तीला चकवा देतो. हा रिसेप्टर श्वसन नलिकेत आणि फुफ्फुसांमध्ये असतो, जिथे ऑसिजन आणि कार्बन डायऑसाइडची देवाणघेवाण होते. सध्याचा विषाणू या रिसेप्टरवर परिणाम करत असल्यामुळेच श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णांच्या शरीरातील ऑसिजनची पातळी कमी होत आहे.
गेल्या पाच वर्षांत कोविड विषाणूने विविध लाटांमधून ज्या व्यक्तींमध्ये अधिक धोका आढळला, त्यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती (६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे), सहव्याधी असलेले रुग्ण म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार असणारे रुग्ण, हृदयविकारग्रस्त, लठ्ठ लोक, स्टिरॉईड्सवर असलेले, कॅन्सरच्या थेरपी घेणारे रुग्ण, अंग प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी आहे हे लोक विशेष संवेदनशील ठरले आहेत. यावेळीही त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या बातम्या येत असल्या, तरी सर्वसामान्य लोकांनी घाबरण्याची गरज नाही. याऐवजी जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींची (उच्च-धोका गट) विशेष काळजी घ्यायला हवी. वयोवृद्ध, सहव्याधी असलेले, लहान मुले, प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. २०२० आणि २०२१ च्या तुलनेत कोविडचा धोका काहीसा कमी असला तरी असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. विशेषतः उच्च-जोखीम गटांनी अधिक काळजी घेणे आणि संसर्ग टाळणे हेच सुरक्षिततेचे सर्वोत्तम मार्ग आहेत.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र