थोडी थंडी वाढली की कुडकुडायला होते. बर्फ हातात घेतला की काही वेळानंतर तो हातात धरेनासा होतो. पण, जगात सर्वात थंड गोष्ट कोणती असेल याचा आपण क्वचितच विचार केला असेल. आता ही सर्वात थंड गोष्ट म्हणजे कोरडा बर्फ ज्याला स्पर्श केले, तरी आपण गारठून जाऊ. कोरडा बर्फ हा खूप थंड असतो. हा कार्बन डायऑक्साईडचा घनरूप आहे. सामान्य घरगुती बर्फाचे तापमान उणे 2-3 अंश सेल्सिअस असते. पण, कोरड्या बर्फाच्या पृष्ठभागाचे तापमान उणे 80 अंशांपर्यंत असते. त्याला स्पर्श करण्यास मनाई आहे. लिक्विड नायट्रोजन हे कोरड्या बर्फापक्षा जास्त थंड असते. माहितीनुसार लिक्विड नायट्रोजन हा सर्वात थंड पदार्थ मानला जातो. हा रंगहीन आणि चवहीन वायू आहे.
रसायनशास्त्रात नायट्रोजनचे संबोधन एनटू असे आहे. आपल्या वातावरणात नायट्रोजन मुबलक प्रमाणात आहे. पृथ्वीचा सुमारे एक आठवा भाग नायट्रोजन वायूने बनलेला आहे. सामान्यतः त्याचे तापमान – 346 सेल्सिअस आणि – 320.44 सेल्सिअस दरम्यान असते. जे एखाद्या व्यक्तीला सहन करणे फार कठीण असते. अशा परिस्थितीत ते कोरड्या बफपिक्षाही धोकादायक ठरते. नायट्रोजन नेहमीच घन स्वरूपात उपलब्ध असतो. त्यामुळे त्याचे कृत्रिमरीत्या द्रवात रूपांतर होते. जेव्हा नायट्रोजनचे तापमान – 195.8 अंश सेल्सिअसच्या खाली जाते, तेव्हा ते द्रव स्वरूपात रूपांतरित होते. आपल्या पृथ्वीवर असे कोणतेही ठिकाण नाही, जिथं तापमान इतके कमी आहे.
पांचजन्य वृत्तपत्र