लेख-समिक्षण

कृत्रिम दागिने घेताना…

सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी या मौल्यवान धातूंच्या दागिन्यांची खरेदी करणे कठीण होत आहे. परिणामी, स्त्रिया पारंपरिक दागिन्यांऐवजी आता कृत्रिम दागिन्यांना अधिक पसंती देत आहेत.
हे दागिने केवळ स्टायलिश आणि परवडणारेच नसून, विविध पोशाखांशी सहजगत्या मॅच होतात. मात्र, टिकाऊ आणि योग्य गुणवत्तेच्या कृत्रिम दागिन्यांची निवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कधीकधी किमतीत बचत करण्याच्या प्रयत्नात खराब दर्जाचे दागिने खरेदी केले जातात; परंतु अशा दागिन्यांमध्ये वापरलेले साहित्य कमकुवत असते आणि फिनिशिंग योग्य नसल्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात.
हलया आणि सुमार दर्जाच्या दागिन्यांमध्ये रंग बदलणे, गडद पट्टे येणे किंवा लवकर तुटणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
त्वचेला कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होण्याची शयता असेल किंवा संवेदनशील त्वचा असेल, तर निकेल-फ्री आणि हायपोअ‍ॅलर्जेनिक दागिन्यांची निवड करावी. स्टेनलेस स्टील, सिल्व्हर प्लेटेड किंवा ऑसिडाइझ्ड दागिने त्वचेसाठी अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतात, कारण या दागिन्यांमुळे सहसा त्वचेची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.
दागिने खरेदी करताना त्यावरील पॉलिशिंगच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे. उच्च दर्जाच्या दागिन्यांवर गोल्ड, रोज गोल्ड, सिल्व्हर किंवा अँटी-टार्निश कोटिंग असते, ज्यामुळे ते रंग लवकर फिकट पडत नाहीत. पण पॉलिशिंग नीट नसेल, तर ते लवकर खराब होण्याबरोबरच त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
कृत्रिम दागिने फार जड नसावेत. रोज वापरणार असाल तर हलया वजनाचे दागिने अधिक योग्य ठरतात. एकूणच योग्य निवड केल्यास कृत्रिम दागिने सौंदर्यात भर घालण्यासोबतच दीर्घकाळ टिकू शकतात.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …