स्वयंपाकघरात वापरला जाणारा कांदा योग्य प्रकारे साठवून ठेवणे खूप गरजेचे असते. पावसाळ्याच्या दिवसांत ओलाव्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे कांदा सडण्याची आणि कुजण्याची शक्यता सर्वाधिक असतो. कांदा साठवणुकीची सर्वांत मोठी अडचण म्हणजे तो फ्रिजमध्ये ठेवता येत नाही. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास तो लवकर अंकुरित होतो. अनेकदा त्याला बुरशी येते. असा कांदा वापरणे हानिकारक ठरू शकते. याउलट योग्य साठवणुकीमुळे कांद्याची चव, त्यातील गुणधर्म टिकून राहतात.
सध्या इंटरनेटवर कांदा साठवण्यासंदर्भातील 100 वर्षे जुना एक देशी उपाय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ही पद्धत जितकी सोपी आहे तितकीच प्रभावीही आहे. उत्तरेकडील लोक जुन्या काळात कांदा साठवण्यासाठी एक खास पारंपरिक पद्धत वापरत असत. यासाठी सुकलेले गवत आणि सागवान किंवा कडुनिंबाच्या पानांची गरज भासते. या पद्धतीत गवत आणि पेंढ्यांनी एक प्रकारचा चौकट तयार केली जाते. त्यात कांदे भरले जातात आणि वरून सागवान किंवा कडुनिंबाच्या पानांनी झाकले जाते. सुकलेलं गवत हे एक नैसर्गिक इन्सुलेटर म्हणून काम करतं. ते कांद्याच्या भोवती एक नैसर्गिक संरक्षक थर तयार करतं, जो अचानक होणाऱ्या तापमान बदलांपासून संरक्षण देतो. गवतामधून वायूविजन उत्तम होत असल्यामुळे कांद्याच्या आजूबाजूला ओलावा साचत नाही. त्यामुळे तो सडणे, अंकुरित होणे यांपासून बचाव होतो.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र