विक्की कौशलचा ’छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली विजयी घोडदौड कायम ठेवून आहे. रेकॉर्ड तोडण्याची त्याची भूक अद्याप संपलेली दिसत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडणारा हा चित्रपट सहाव्या वीकेंडनंतरही जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आज 39 दिवस पूर्ण झाले आहेत. आज या चित्रपटाने बॉलीवुडमधील जवळपास सर्व मोठ्या चित्रपटांच्या आजीवन कमाईला मागे टाकलं आहे, फक्त शाहरुख खानचा ‘जवान’ पुढे आहे. आजच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले असून, ‘छावा’ने किती कमाई केली, हे पाहूया.
अधिकृत आकडेवारीनुसार, ‘छावा’ने पहिल्या 35 दिवसांत (5 आठवड्यांत) हिंदीतून 571.40 कोटी आणि तेलुगूतून दोन आठवड्यांत 14.41 कोटी रुपये कमावले. म्हणजेच, एकूण 585.81 कोटी रुपये कमाई झाली होती. त्यानंतर 36व्या, 37व्या आणि 38व्या दिवशी दोन्ही भाषांमध्ये अनुक्रमे 2.1 कोटी, 3.65 कोटी आणि 4.65 कोटी रुपये मिळाले. यामुळे 38 दिवसांत एकूण कमाई 596.21 कोटी रुपये झाली. सॅक्निल्कवरील आज दुपारी 5:15 वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार, चित्रपटाने आज 0.76 कोटी रुपये कमावले असून, एकूण कमाई 596.97 कोटी रुपये झाली आहे.
‘छावा’ने आज एक असा पराक्रम केला आहे, जो अनेक चित्रपटांना थिएटरात महिनोनमहिने टिकूनही जमलं नाही. या चित्रपटाने बॉलीवुडच्या सर्वाधिक कमाई करणार्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीत तिसर्या स्थानावरून दुसर्या स्थानावर उडी घेतली आहे.
‘छावा’ने श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाच्या 597.99 कोटींच्या आजीवन कमाईला मागे टाकलं. आता फक्त शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ‘छावा’च्या पुढे आहे, ज्याने 2023 मध्ये 640.25 कोटी रुपये कमावले होते.
या चित्रपटाने बॉलीवुडमध्ये एक नवा अध्याय लिहिला आहे. आता हा चित्रपट ‘जवान’चा विक्रम मोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे!
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र