लेख-समिक्षण

एमिलिया क्लार्कची प्रेरणादायी कहाणी

तुम्हाला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतून डेनेरिस टार्गेरियनची भूमिका करणारी एमिलिया लार्क परिचित असेल. परंतु तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल की ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या सुरुवातीच्या सिझनदरम्यान तिला दोन भयानक मेंदूतील गाठी (ब्रेन अ‍ॅॅन्युरिझम) झाल्या होत्या ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता.
पहिल्या सिझनच्या अगोदरच, व्यायाम करताना तिच्या डोयात भोसकावे, कापल्यासारखे तीव्र वेदना होऊ लागल्या. तपासणीसाठी केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये अ‍ॅन्युरिझम असल्याचे आढळले आणि तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.
शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसन काळात ती इतकी असाहाय्य आणि आगतिक झाली की तिला नीट सलग वाय जोडता येत नव्हते, अगदी स्वतःचे नावही विसरून जायची. ती घाबरली होती, तिच्या परिस्थितीबद्दल तीव्र भीतीने ती ग्रासली होती.
एकदा सावरल्यानंतर ती पुन्हा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या कामावर परतली. पण तिथेच तिला पुन्हा आणखी एक अ‍ॅॅन्युरिझम असल्याचे समजले, ज्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार होती. तिसर्‍या सिझनपर्यंत या गाठीचा आकार दुपटीने वाढला होता. या दुसर्‍या शस्त्रक्रियेनंतर एमिलिया प्रचंड वेदनेत जागी झाली. शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आणि जर पुन्हा शस्त्रक्रिया केली नाही तर तिचे जगणे अशय असल्याचे डॉटरांनी सांगितले. पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आणि यावेळी ती यशस्वी ठरली. मात्र पुनर्वसनाची प्रक्रिया यापूर्वीपेक्षा अधिक कठीण होती. एमिलियाला घबराटीचे झटके यायचे. अत्यंत वाईट क्षणी तिने वैद्यकीय कर्मचार्‍यांना आपल्याला मरू द्यावे अशीही विनंती केली होती. सुदैवाने, एमिलिया पूर्णपणे बरी झाली आणि आता तिच्या शरीरात कोणतेही अ‍ॅॅन्युरिझम उरलेले नाही.
अशा संकटातून स्वतःला पुन्हा उभे करणे आणि जगातील सर्वात मोठ्या मालिकांपैकी एका मालिकेत शिखरावर पोहोचणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …