शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा त्यात विचार करणे अणि मेहनत करणे क्रमप्राप्त ठरते. यातूनच विश्लेषणात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. एखादा निबंध लिहण्यासाठी किंवा अन्य कामासाठी विद्यार्थी किंवा तरुण चॅटजीपीटीचा वापर करतात तेव्हा ते शिकण्याची क्षमता नकळतपणे कमी करतात. एआय शिकण्याच्या कामात अडचणी आणतो, तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्ध्यांकाचे होणारे नुकसान कळत नाही आणि ते नकळतपणे त्याच्या आहारी जातात. पालकांचे लक्ष मात्र त्यांच्या गुणांवर असते आणि गुण मात्र सर्वंकष विकासाचे खूपच कमी प्रमाणात चित्र मांडते. त्याचवेळी एआयकडून ही शक्ती अजून क्षीण केली जाते.
आजमितीस जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता अध्यापन आणि शिक्षणाच्या विविध पैलूवर प्रभाव टाकण्यासाठी सज्ज आहे. म्हणूनच एआय टूल्समुळे भविष्यात मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच बडया कंपन्या देखील या दिशेने काम करत आहेत. गेल्या जून महिन्यात गुगलने स्वत:चे एआय ‘जेमिनी’वर तीस नवीन शैक्षणिक टुल्स सुरू केले अणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ओपन एआयने देखील चॅटजिपीटीवर स्टुडंट टयुटर स्टडी मोड कार्यान्वित केले.
अर्थात नवे डिजिटल तंत्रज्ञान मुलांपर्यंत योग्य रितीने पोचत आहे की नाही याबाबत पालकांनी सजग राहणे तितकेच गरजेचे आहे. कारण त्याच्या दुरपयोगाची उदाहरणे आपण ऐकत आहोत. वीस वर्षापूर्वी देखील सोशल मीडियाचे आगमन झाल्यानंतर तरुणाईवर अशाच प्रकारचा प्रचंड भावनिक प्रभाव पडला होता. एआयच्या अतिरेकामुळे मुलांचे केवळ भावनात्मक आरोग्यच नाही तर त्यांची कल्पनाशक्ती देखील खुंटण्याची शयता आहे. विचार करण्याचा कंटाळा येणे आणि त्यासाठी एआय टुल्सवर अवलंबून राहणे यात मनुष्यप्राणी पारंगत आहे. अर्थात काहीप्रमाणात तथ्यही आहे. एखाद्या शहराकडे जाण्याचा रस्ता जीपीएस दाखवू शकतो तर कागदावरचा नकाशा पाहायचा कशाला? चॅटजीपीटी आणि जेमिनी विचार करण्यासाठी उपलब्ध असतील तर विचार करण्यात वेळ का दवडायचा? मात्र जेव्हा शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा त्यात विचार करणे अणि मेहनत करणे क्रमप्राप्त ठरते. यातूनच विश्लेषणात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. जसे व्यायाम केल्याने शरीर सुडौल होतो, तसेच विचार केल्याने मेंदुचा विकास होतो. प्रामुख्याने मानसिक आणि शारिरीक विकास होत असलेल्या वयातील मुलांसाठी ही बाब आवश्यक आहे.
काही एआय टुल काळजीपूर्वक तयार केले ्रअसून ते मुलांची कल्पनाशक्ती ओळखून त्यांना समजून घेत त्यांच्यात शिकण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी हातभार लावू शकतात. ओपनएआयच्या दाव्यानुसार, चॅटजीपीटीमधील स्टडी मोडची रचना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता ओळखणारी आहे. मात्र जेव्हा हे टुल्स विद्यार्थ्यांसाठी विचार करण्याचे काम करू लागतात तेव्हा हे टुल्स उपयुक्त ठरत नाहीत. दुर्देवाने मुले आणि तरुण मंडळी देखील एआयचा वापर विचार करण्यासाठीच करत आहेत. एखादा निबंध लिहण्यासाठी किंवा अन्य कामासाठी विद्यार्थी किंवा तरुण चॅटजीपीटीचा वापर करतात तेव्हा ते शिकण्याची क्षमता नकळतपणे कमी करतात. एखादी सायकल मुलाला आसनावर बसवत असेल आणि पेडल आणि हँडलचा ताबा स्वत:कडेच ठेवत असेल तर मुलगा सायकल कसा शिकेल? इतिहासाचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी जेमिनी अणि डिपसिकचा वापर करू लागतात तेव्हा ते अशा प्रकारच्या सायकलवरून प्रवास करत असतात.
एमआयटीच्या अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासात लेखन कौशल्यावर एआयचा वाढत्या प्रभावाचे विश्लेषण करण्यात आले. त्यांनी १८ ते ३९ वयोगटातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या तीन गटांना विभागले. एकाने प्रारंभीपासूनच चॅटजिपीटीची मदत घेतली, दुसर्याने स्वत: लिखाण केले, मात्र ते गुगल सर्चचा वापर करू शकत होते आणि तिसर्या गटाला कोणत्याच टुलचा वापर करण्यास परवानगी नव्हती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी चॅटजिपीटीचा वापर करून स्वत:च्या लेखनाला दुरुस्त करण्यास सांगण्यात आले. ज्या लोकांनी सुरुवातीपासूनच चॅटजिपीटीचा आधार घेतला होता, त्यांचे लेखन सर्वात सुमार असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विचारशक्तीचे आकलन केले असता त्यांच्यात शिकण्याच्या संबंधित असलेला भाग कमी सक्रिय असल्याचे निदर्शनास आले. परिणामी त्यांना लेखनात दुरुस्ती करताना अडचणी आल्या. कारण लेखनाचे काम त्यांनी स्वत: केलेले नव्हते. लेखनाची सुरुवात आणि शेवट कसा झाला आहे, हे विद्यार्थ्यांना ठाऊकच नसल्याने त्यात दुरुस्ती करताना गोंधळ उडाला. मात्र ज्या उमेदवारांनी कोणत्याही टुलची मदत न घेता लेखन केले, त्यांचे लिखाण सर्वोत्तम ठरले.
एआयच्या प्रभावापासून विद्यार्थी आता वंचित राहू शकत नाहीत, हे या अभ्यासाने दाखवून दिले. विचारासाठी एआयवर अवलंबून राहणार्यांचे भविष्यात काय होणार, यावरही अभ्यासात प्रकाश टाकण्यात आला. शिकण्याची एक प्रक्रिया असते. सातवीच्या वर्गातील शिक्षक हे विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या रितीने निबंध लिहावा या हेतूने शिकवत नाहीत. मुलांत बौद्धिक क्षमता आणि विचारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने विषय देतात. मात्र जेव्हा एआय अशा प्रकारच्या कामात अडचणी आणतो, तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्ध्यांकाचे होणारे नुकसान कळत नाही आणि ते नकळतपणे त्याच्या आहारी जातात. पालकांचे लक्ष मात्र त्यांच्या गुणांवर असते आणि गुण मात्र सर्वंकष विकासाचे खूपच कमी प्रमाणात चित्र मांडते. त्याचवेळी एआयकडून ही शक्ती अजून क्षीण केली जाते. पालक मुलांना एआयचा योग्य तर्हेने वापर करण्याचे सांगतील नसतील तर त्यांच्या अंगी पालक नव्या उणीवाची भर घालत असतात.
ग्रामरली
ग्रामरली एआय टूल मशिन हे लर्निंग आणि डीप लर्निंगच्या मदतीने भाषेचे विश्लेषण करते. हे टुल चोवीस तास एका शिक्षकाप्रमाणेच युजरच्या मदतीसाठी सदैव सज्ज असते. युजरला शिकवताना हा टूल किचकट वायात सुटसुटीतपणा आणतो आणि शॉर्टकट सांगतो. मुलभूत व्याकरण, ओळीतील विराम चिन्हांची तपासणी करण्याबरोबरच संक्षिप्त आणि स्पष्टता आणण्यासाठी एआयचा वापर करतो. तसेच विचार अणि मंथनासाठी देखील मदत करतो. यात अनेक एसटेशन आणि इंटिग्रेशन आहेत. म्हणूनच ज्या ठिकाणी टेस्ट बॉस असतो तेथे तेथे यूजर त्याचा वापर करतात.-प्रमिला भालके,शिक्षणक्षेत्राच्या अभ्यासक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र