लेख-समिक्षण

उलगडणार चंद्रनिर्मितीचे रहस्य

भारताच्या ‘चांद्रयान-१’ या मोहिमेवेळीच चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे, हे महत्त्वाचे संशोधन झाले होते. आता ‘चांद्रयान-३’ मोहिमेने यशस्वी टप्पा गाठला आहे. ‘चांद्रयान-३’ च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून अत्यंत महत्त्वाचा डेटा पाठवला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली, या सर्वात मोठा रहस्याचा लवकरच उलगडा होण्यास मदत होणार आहे.
प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर १६० किलोमीटर व्यासाचा एक नवीन खड्डा शोधला आहे. दक्षिण ध्रुवाजवळील अटकिन बेसिनपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या उंच भागाजवळच हा खड्डा आहे. लँडिंगनंतर चंद्रावर भ्रमण करताना प्रज्ञान रोव्हरने हा खड्डा शोधला होता. प्रज्ञान रोव्हरच्या नेव्हिगेशन आणि हाय रिझोल्युशन कॅमेर्‍यांच्या मदतीने डेटा गोळा केला होता. या डेटाच्या अभ्यातून या विवराची रचना उघड झाली आहे. अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञांनी या डेटाचे विश्लेषण करून नव्या संशोधनबाबतचा अहवाल विज्ञान डायरेक्टच्या नवीन अंकात प्रकाशित केला आहे. चंद्रावरील १६० किलोमीटर व्यासाच्या खड्ड्यासह दक्षिण ध्रुवाजवळील अटकिन बेसिनजवळ १,४०० मीटरचा ढिगारा आढळला आहे. १६० किलोमीटर व्यासाचा हा खड्डा अटकिन बेसिनच्या निर्मितीपूर्वीचा असावा, असा संशोधकांचा दावा आहे. प्रज्ञान रोव्हरने गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने नवीन स्तरातील धूळ आणि खडकांची संरचना यांच्या मदतीने चंद्राच्या सुरुवातीच्या भूगर्भशास्त्रीय उत्क्रांती समजून घेण्यास मदत होणार आहे. तसेच चंद्राची निर्मिती कशी झाली, याचा उलगडा होण्यास देखील मदत होणार आहे. चंद्र मोहिमेतील हे सर्वात मोठे संशोधन मानले जात आहे.
१४ जुलै २०२३ रोजी भारताचे चांद्रयान-३ चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ चंद्राकडे झेपावलं. यानंतर २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. विक्रम लँडरमधून बाहेर पडलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने गोळा केला आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …