बॉलीवूडचा ’सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गंभीर दुखापत आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच इमरान ’आवारापन 2’च्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला असून, सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे काम जोमाने सुरू आहे.
ॲक्शन सीनदरम्यान झाली होती दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, ’आवारापन 2’ मधील एका हाय-ऑक्टेन ॲक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना इमरानच्या पोटाच्या स्नायूंना गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. अशा परिस्थितीत कोणताही कलाकार विश्र्ांती घेण्यास प्राधान्य देतो, मात्र इमरानने आरोग्यापेक्षा कामाला महत्त्व देत लवकर सेटवर परतण्याचा निर्णय घेतला.
चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल
इमरान जरी सेटवर परतला असला, तरी निर्मात्यांनी त्याच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली आहे. सध्या राजस्थानमध्ये त्याचे चित्रीकरण कडक वैद्यकीय देखरेखीखाली पार पडत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या शारीरिक हालचालींवर काही बंधने घालण्यात आली असून, तूर्तास जड ॲक्शन सीन्स टाळण्यासाठी चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
टीमसाठी ठरला प्रेरणास्थान
शारीरिक आव्हानांवर मात करून कामावर परतलेल्या इमरानच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या व्यावसायिक वृत्तीमुळे (झॲेषशीीळेपरश्रळीा) चित्रपटाची संपूर्ण टीम थक्क झाली असून, त्याच्या या कृतीने सेटवरील वातावरण अधिकच सकारात्मक झाले आहे. ’आवारापन 2’ हा इमरानच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट मानला जात असून, या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये आता या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.- किर्ती कदम
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र