लेख-समिक्षण

इथे इंटरनेट वापरणे गुन्हा!

आजच्या युगात इंटरनेट हा जणू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एक काळ असा होता, जेव्हा लोक टूजी इंटरनेट वापरून देखील खूश होते, पण आता फोरजी इंटरनेट स्पीड देखील लोकांना कमी पडू लागली आहे. कारण, आता रोजच्या जीवनातील सर्वच गोष्टी इंटरनेटशी संबंधित आहेत. मनोरंजक कामासाठी जसे व्हिडीओ, सिनेमे पाण्यासाठी देखील इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो, पण तरीही असे काही देश आहेत जिथे इंटरनेट वापराला बंदी आहे किंवा त्यावर कडक निर्बंध आहेत. आता हे देश कोणते असा प्रश्न साहजिकच निर्माण होईल. उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, क्यूबा यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
राजकीय स्थिरता : अनेक देशांमध्ये सरकार इंटरनेटला एक धोका म्हणून पाहतात. इंटरनेटमुळे लोकं जागृत होतात आणि सरकार विरोधी भावना पसरू शकतात. धार्मिक कारणे : काही देशांमध्ये धार्मिक कारणांसाठी इंटरनेटवर बंदी असते. त्यांना वाटते की इंटरनेटवर अशी माहिती उपलब्ध आहे जी त्यांच्या धार्मिक विश्वासांच्या विरोधात आहे.
काही देशांमध्ये सरकारला वाटते की इंटरनेटमुळे समाजात अराजकता पसरू शकते. काही देशांमध्ये इंटरनेटवर बंदी आहे, कारण त्यांना वाटते की इंटरनेटचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ शकतो. उत्तर कोरिया हा सर्वात कडक इंटरनेट नियम असलेला देश आहे. येथे इंटरनेटचा वापर फक्त सरकारच्या अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित आहे. तुर्कमेनिस्तानमध्येही इंटरनेटवर बंदी आहे, फक्त काही विशिष्ट वेबसाइट्सलाच प्रवेश मिळतो.
क्यूबामध्ये इंटरनेटचा वापर खूप मर्यादित आहे आणि त्यासाठी विशेष परवाना आवश्यक आहे. इंटरनेटवर बंदी असल्यामुळे लोकांना बाह्य जगातील घडामोडींबद्दल माहिती मिळणे कठीण होते. इंटरनेट शिकण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. इंटरनेटवर बंदी असल्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो. इंटरनेटचा वापर व्यापार आणि उद्योगांसाठी खूप महत्त्वाचा आहे. इंटरनेटवर बंदी असल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो, अशी पार्श्वभूमी यामागे आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …