लेख-समिक्षण

आरोग्यसेवेची वेगळी वाट

बहुउपयोगी आरोग्य कर्मचारी ही संकल्पना तशी जुनीच आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर निर्माण होणार्‍या स्थितीत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अशा कर्मचार्‍यांमार्फत केले जाते. ज्या ठिकाणी रुग्णालये, इस्पितळे नाहीत, त्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम या कर्मचार्‍यांना करावे लागते. हिवताप, कुष्टरोग, टीव्ही यांसारख्या व काही संसर्गजन्य आजारांचा फैलाव झाल्यास त्या संदर्भातील उपाययोजना करण्याचे काम मल्टिपर्पज हेल्थ वर्करकडून केले जाते. त्यातबरोबर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत जागरुकता निर्माण करणे, संसर्गजन्य आजार पसरू नयेत याकरिता प्रतिबंधात्मक व्यवस्था तयार करणे अशी कामे या कर्मचारी स्वयंसेवकांमार्फत केली जातात.
सावर्र्जनिक आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्धच नाहीत, त्याठिकाणी या उमेदवारांना काम करण्यासाठी पाठविले जाते. दुर्गम डोंगराळ भागात, तसेच आदिवासी बहुल भागात. आरोग्य सेवा पुरवण्याचे काम या कर्मचार्‍यांकडून केले जाते. दुर्गम डोंगराळ भागात, आदिवासी भागात तंबू, राहुट्या उभ्या करून तेथील जनतेला आरोग्य सेवा प्रदान करण्याचे काम हे कर्मचारी करतात.
अभ्यासक्रमात काय शिकवले जाते?
या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या स्थितीत जनतेला कोणत्या प्रकारे आरोग्य सेवा प्रदान करायच्या या विषयीचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. नैसर्गिक आपत्तीनंतर संसर्गजन्य रोग, आजार यांचा फैलाव होऊ नये याकरिता कोणती काळजी घ्यायची या विषयीचे शिक्षणही या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दिले जाते.
शैक्षणिक अर्हता
डिप्लोमा इन मिल्टिपर्पज हेल्थ वर्कर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेता येतो.
नोकरीच्या संधी कोठे?
हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर सरकारी आणि बिगर सरकारी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. हरियाणा, छत्तीसगड या राज्यात अशा आरोग्य कर्मचार्‍यांना सध्या मागणी वाढली आहे. केंद्र सरकारचा आरोग्य, कुटुंब कल्याण विभाग, राज्य सरकारचे आरोग्य खाते, पर्यावरण विभाग याबरोबरच अनेक बिगर सरकारी संस्थांमध्ये (एनजीओ) नोकरीच्या विपूल संधी उपलब्ध होतात. याखेरीज काही खासगी कंपन्यांमध्येही अशा प्रकारच्या करर्मचार्‍यांची नोकर भरती केली जाते. दुर्गम, आदिवासी विभागात जाऊन तेथील कुटुंबाची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे, त्या भागात साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची भिती असेल तर तो रोखण्यासाठीची उपाययोजना करणे, सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे, आपत्तीनंतर सामान्य नागरिकांना आरोग्याच्या किमान सुविधा पुरवणे अशी कामे या आरोग्य कर्मचार्‍यांना करावी लागतात.
वेतन किती मिळते?
डिप्लोमा इन मल्टिपर्पज हेल्थ वर्कर हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना सुपरवायझर व डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळते. सुरुवातीच्या काळात या कर्मचार्‍यांना १० ते १५ हजार एवढे वेतन दिले जाते. या क्षेत्रातीत अनुभव वाढल्यानंतर वेतनातही वाढ होते.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …