आपल्या अनेक मुलाखतीतून ’महाभारत’ यावर सिनेमा काढण्याचे बोलणार्या आमिर खानने येत्या ऑगस्टपासून त्यावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे ’रामयण’ तयार होत असताना ’महाभारता’च्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शयता आहे. थोडयात लवकरच भारतीय चित्ररसिकांना या दोन्ही महाकाव्यांना रुपेरी पडद्यावर पहाता येणार आहे.
मनिष मल्होत्रा यांच्या ’रामायण’ या चित्रपटाचे दोन भाग येणार आहेत. आमिर खान याच्या ’महाभारता’चे काही भाग होण्याची शयता आहे. हा चित्रपट रामायणासारखाच भव्य असेल अशी अटकळ बांधली जात आहे. याबाबत आमिर खानने सांगितले की, ’ऑगस्टपासून ’महाभारत’ रुपेरी पडद्यावर आणण्याच्या कामाला सुरुवात करत आहे. एकापाठोपाठ हे चित्रपट येतील. कारण ’महाभारत’ एका सिनेमात सांगता येणारे नाही.
‘महाभारत’ या चित्रपटासाठी आतापर्यंत न चमकलेले चेहरे निवडणार आहे. माझ्या म्हणण्यानुसार,’महाभारता’तले प्रत्येक पात्र हे स्वत:च स्टार आहे. त्यासाठी मला रसिकांना माहित नसलेले चेहरे हवे आहे. या चित्रपटासाठीचे कलाकार नवखेच घेणार आहे, असा माझा विचार आहे’, असे आमिरने सांगितले. ’ये मेरा सपना है के मै बना पाऊ ’महाभारत’, लेकिन बहोत मुशिकल सपना है वह’, असे आमिर म्हणतो. – जान्हवी शिरोडकर
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र