लेख-समिक्षण

आई मुलाच्या नात्याची आजची गोष्ट ‘उत्तर’

प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी! जन्मानंतर रूढार्थानं त्याची-आईची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ आयुष्यभर जोडलीच राहते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबर प्रत्यक्ष साथ करत राहते. तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं! अशीच आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणाजया ’उत्तर’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शकीय पदार्पण करतोय हे विशेष. ”उत्तर’ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात गुणी आणि चोखंदळ अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहे तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट नेमकी आहे तरी काय, याचं ’उत्तर’ रसिकांना येत्या १२ डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. – नरेंद्र क्षीरसागर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …