रवी मोदी हे कोलकात्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेले रवी मोदी गणितात चांगले होते. त्यांचे वडील कोलकाता येथील एका मार्केटमध्ये किरकोळ दुकान चालवायचे. जिथे मोदी शिकत असताना त्यांच्या वडिलांना मदत करायचे. रवी मोदी इयत्ता दुसरीमध्ये असताना त्यांना गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले होते.
रवी मोदी यांच्या वडिलांचे कोलकात्यात कपड्यांचे छोटेसे दुकान होते. रवी लहानपणापासून वडिलांना मदत करायचे. वयाच्या 13 व्या वर्षापासून ते रोज दुकानात येत होते. त्यांच्याच दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते. नऊ वर्षे दुकानात काम करत असताना त्यांना विक्रीतील गुंतागुंत कळली. यादरम्यान त्यांनी कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉम चे शिक्षण पूर्ण केले.
वडिलांसोबत भांडण झाल्यानंतर रवी यांनी आईकडून 10 हजार रुपये घेतले आणि कपडे बनवायला सुरुवात केली. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या नावावरून त्यांनी त्याचे नाव वेदांत ठेवले. त्याने भारतीय वांशिक पोशाख बनवण्यास सुरुवात केली आणि कोलकाता ते पश्चिम बंगालच्या इतर शहरांमध्ये तसेच उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेशात विकले. त्यांनी बनवलेले कपडे चांगल्या दर्जाच्या आणि डिझाइनमुळं लोकांना आवडले. यानंतर मोदींनी आपल्या कपड्यांना ’मान्यावर’ ब्रँड असे नाव दिले. बाजारपेठेसोबतच त्यांनी विशाल मेगा मार्ट आणि पँटालूनसारख्या मोठ्या दुकानांनाही लक्ष्य केले. रवी मोदी यांनी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये वेदांत फॅशनचे पहिले स्टोअर उघडले. आज त्यांची देशभरात 600 हून अधिक स्टोअर्स आहेत.
स्वत:च्या मेहनतीला जर आईचा आर्शिवाद मिळाला तर काहीही शक्य आहे ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र