टीझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलेल्या ‘असंभव’ या आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलरच्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेचे वण घेतले आहे. गडद लाल-काळ्या पार्श्वभूमी असलेले हे पोस्टर, नजरेतून जणू काही प्रश्न विचारत आहे की, ही कहाणी प्रेमाची आहे की सुडाची? सचित पाटील, मुता बर्वेआणि प्रिया बापट या तिघांचे भावदर्शी चेहरे, शांततेतली अस्वस्थता, आणि हलकं स्मित हे सगं गूढतेचे धागे सोडत आहे. प्रेक्षकांना आतून हलवून टाकणार्या भावनिक थरांना स्पर्श करणारी ही कहाणी, प्रेम आणि सस्पेन्सचा नवा प्रवास घडवून आणणार आहे.
दिग्दर्शक सचित पाटील म्हणाले की, “असंभव’ म्हणजे प्रेम, रहस्य, भीती आणि संघर्ष यांचा सुसंवादी संगम. नैनितालच्या गूढ आणि देखण्या लोकेशन्सवर चित्रीत झालेला हा मराठीतला पहिलाच असा सिनेमॅटिक थ्रिलर आहे.’ नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, ‘सस्पेन्स थ्रिलर प्रकारात मराठीत एक नवे पाऊल टाकणारा ‘असंभव’, अनुभवांची आणि गुणवत्तेची उंची गाठणारा चित्रपट आहे. यातील प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतून बसेल.’ ‘असंभव’ २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे.- स्वाती देसाई
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र