कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत घेऊन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे नव्हते; पण तिने हे शक्य करून दाखवले. तिची ही कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. 2011 मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने दोन वर्षेअधिकारी म्हणून काम केले 2013 पासून यूपीएससी देत राहिली; पण अनेक प्रयत्न्ाानंतरही यश मिळाले नाही. अखेर, 2019 मध्ये सहाव्या प्रयत्न्ाात तिचे आयएएस बनण्याचे स्वप्न साकार झाले सध्या ती कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहे.- वेदिका कुलकर्णी
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र