राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसर्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हानिहाय यादीदेखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७ नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे. २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींचे एकूण प्रभाग ३८२० असून त्यामध्ये एकूण ६८५९ जागा आहेत. त्यापैकी महिलांसाठी ३४९२ जागा, अनुसूचित जातींसाठी ८९५ जागा, अनुसूचित जमातींसाठी ३३८ जागा आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १८२१ जागा आरक्षित आहेत.
या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वगार्साठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खचार्ची मर्यादा ठरवण्यात आली आहे. या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असून त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र, त्याचबरोबर मोबाईल अॅपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.
नगरपरिषद व नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५ रोजीपासून होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी, अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ रोजी, आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ रोजी, निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होऊन मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी घोषित होईल.राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसर्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हानिहाय यादीदेखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७ नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे. २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींचे एकूण प्रभाग ३८२० असून त्यामध्ये एकूण ६८५९ जागा आहेत. त्यापैकी महिलांसाठी ३४९२ जागा, अनुसूचित जातींसाठी ८९५ जागा, अनुसूचित जमातींसाठी ३३८ जागा आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १८२१ जागा आरक्षित आहेत.
या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वगार्साठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खचार्ची मर्यादा ठरवण्यात आली आहे. या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असून त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र, त्याचबरोबर मोबाईल अॅपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.
नगरपरिषद व नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५ रोजीपासून होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी, अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ रोजी, आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ रोजी, निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होऊन मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी घोषित होईल.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र