लेख-समिक्षण

रविवार विशेष

डिजिटल स्वप्नव्यत्यय

झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …

Read More »

नवविस्थापित

री करणारे ती एक कला मानतात आणि बर्‍याच प्रमाणात ती असतेही! कडेकोट बंदोबस्तात जपून ठेवलेला ऐवज हातोहात लांबवणं सोपं नसतं. पण बर्‍याच वेळा काय चोरावं, हे चोरांना कळत नाही आणि हाताला लागतील त्या वस्तू ते पळवून नेतात. त्यामुळं कधी-कधी चोरीला गेलेल्या ऐवजाच्या यादीत पैसाअडका, सोनंनाणं याबरोबरच अशा काही वस्तू दिसतात, ज्यांचा चोरांना काही उपयोग नसतो आणि त्या विकताही येत नाहीत. …

Read More »

देण-घेणं

कोंबडी आधी की अंडं आधी, हे कोडं एकवेळ सुटू शकेल; पण सरकारी योजना आधी की ती अयशस्वी करण्याची वृत्ती आधी, हे कोडं सुटणार नाही. तसं बघायला गेलं, तर जगात ‘फ्री’ म्हणून दिली जाणारी गोष्टही कधी फुकट मिळत नसते. मग ती कंपन्यांची स्कीम असो वा सरकारी अनुदान असो. अमक्या वस्तूबरोबर तमकी वस्तू मोफत, अशी कितीही जाहिरातबाजी केली तरी दोन्ही वस्तू हातोहात …

Read More »

पुन्हा तारीख

महाप्रलय… कयामत… जजमेन्ट डे… बहुतांश धर्मविचारांमध्ये या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. पृथ्वीचा आणि संपूर्ण सजीवसृष्टीचा नाश या संकल्पनेत अभिप्रेत आहे. या दिवसाचं स्मरण ठेवून आपली कृती असावी, पाप करण्याची दुर्बुद्धी होऊ नये, सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा हेतू यामागे आढळतो. महाप्रलय म्हणजे एका युगाचा अंत आणि दुसर्‍या युगाची सुरुवात, असं मानलं जातं. जगात पापाचा भार वाढला की प्रलय येतो. पुण्यवान लोकांना …

Read More »

खरा इशारा

कामाशिवाय घराबाहेर पडू नका,’ हा सरकारी इशारा आता ‘अफवांवर विश्वास ठेवू नका,’ या सल्ल्याइतकाच सपक, निरर्थक आणि वेडगळपणाचा वाटू लागलाय. डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या युगात माहितीचा धबधबा डोक्यावर कोसळत असताना, त्यातली कोणती माहिती खरी आणि कोणती अफवा, हे ओळखण्याइतका नीरक्षीरविवेक 140 कोटी लोकांमध्ये आहे, असं गृहित का धरायचं? अफवांचं पीक येऊ नये असं वाटत असेल तर आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी माहितीतंत्राची व्याप्ती वाढवायला …

Read More »

होम डिलिव्हरी

पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज कमी-जास्त (कमी कमीच; जास्तच जास्त) करण्याची स्कीम सुरुवातीला दोनच राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवली गेली होती. त्यात ‘प्रयोग’ नेमका कोणता होता आणि तो यशस्वी झाला की नाही, याची माहिती मिळण्याआधीच ही स्कीम देशभर लागू झाली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या योजनांमुळं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी किंवा भाऊ खूश झालेत की नाही, हे कळायला ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडावा लागेल. पण …

Read More »

विचित्र वास्तव

णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अ‍ॅडम ब्रिटन …

Read More »

निर्जीवाचा जीव

हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्‍या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्‍या …

Read More »

अज्ञानाचे बळी

निसर्गावर विजय वगैरे मिळवणं आपल्याला कधीच शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते; पण कथित आर्थिक विकासाच्या कैफात आपल्याला तसं पदोपदी वाटू लागलंय, हे मात्र खरं. निसर्ग हा सातत्यानं आपल्याला काही ना काही देत राहतो आणि आपण सातत्यानं त्याला ओरबाडत राहतो. त्यामुळं एकीकडे पैसा फुगत चाललाय आणि दुसरीकडे निसर्ग जखमी होत चाललाय. खिसे फुगल्यामुळं पर्यटनाचा पूर आलाय; पण पर्यटन कशाला म्हणायचं, …

Read More »

नाव बदलला!

हिमालयात वगैरे जाण्याची पैज लावली जाते; पण ज्या नावात आपला जीव अडकलेला असतो, ते बदलण्याची पैज लावणारा आणि मुख्य म्हणजे पाळणारा नेता आंध्र प्रदेशात नुकताच पाहायला मिळाला. राज्याचे माजी मंत्री आणि वायआरएस काँग्रेसचे नेते मुद्रगदा पद्मनाभम यांनी हा विक्रम त्यांच्या ‘नावावर’ केलाय. आंध्र प्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाली. चंद्राबाबू नायडूंच्या यशाबरोबरच जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण …

Read More »