लेख-समिक्षण
  • 17 Aug 2025

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4199

TimeLine Layout

July, 2025

  • 27 July

    मुंबई बॉम्बस्फोट निकालाला आव्हान

    २००६ मध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर ११ मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणात १९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातील १२ आरोपींपैकी एकाचा आधीच मृत्यू झालेला …

    Read More »
  • 27 July

    उपराष्ट्रपतींचे वादपुराण

    जगदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व कामकाज सुरळीत पार पडत असताना सायंकाळी अचानक त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या रुपातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकिर हुसेन, गोपाल स्वरुप पाठक, आर. वेंकटरमन, शंकरदयाळ शर्मा, डॉ. के. आर. नारायणन, कृष्णकांत, …

    Read More »
  • 27 July

    एआयच्या मदतीने शिक्षणक्रांती

    प्राचीन काळापासून शिक्षणाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे हा नव्हता, तर त्यांना आयुष्यातील विविध पैलूंसाठी तयार करणे देखील होता. तो साध्य होण्यासाठी शिक्षण प्रणाली लवचिक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक पातळीवर लक्ष देणारी असावी. एआयच्या मदतीने हे उद्दिष्ट आता अधिक सोपे झाले आहे. तथापि, शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांचीभूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि राहणार आहे, कारण एआयकडे मानवी समज आणि भावना नसतात. …

    Read More »
  • 20 July

    कार्तिकचे क्रोएशियामधील वेळापत्रक पूर्ण

    बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. गेला महिनाभर क्रोएशियात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटाची स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्ससोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्रपटाचे क्रोएशियातील वेळापत्रक पूर्ण झाले …

    Read More »
  • 20 July

    बॉलीवूडच्या अपयशास जबाबदार कोण?

    सध्या बॉलिवूडची स्थिती खरोखरच चिंताजनक आहे. अलीकडच्या काळात अनेक मोठ्या चित्रपटांनी रसिकांना निराश केले आहे. सातत्याने होणार्‍या चित्रपटांच्या अपयशाने बॉलिवूडची पायाभूत रचना डळमळीत झाली आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात असली, तरी चित्रपट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे की, याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द चित्रपट तारेच आहेत. तेच प्रत्येक चित्रपटाचे भविष्य घडवू शकतात, पण ते तसे करत नाहीत. मोठ्या नायकांची मनमानी …

    Read More »
  • 20 July

    जीमेलवर चुटकीसरशी शोधा जुना ईमेल

    जीमेल हे भारतातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे. आज स्मार्टफोन वापरणार्‍या जवळपास प्रत्येकाकडे जीमेलचे अकौंट आहे. काही जण १०-१५ वर्षांपासून जी-मेल वापरत आहेत. काही वेळा असा प्रसंग येतो की, आपल्याला खूप वर्षांपूर्वीचा एखादा मेल शोधायचा असतो. यासाठी तुम्ही सतत जुने मेल्स स्क्रोल करत बसता, पण तो सापडत नाही. खूप वेळ यात निघून जातो. पण जीमेलची एक खास ‘सिक्रेट ट्रिक’ …

    Read More »
  • 20 July

    फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?

    तोंड धुण्यासाठी साधा पाणीपुरताच पुरेसा नाही, कारण आपल्या त्वचेवर दिवसभर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषणाचे थर बसतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करणे गरजेचे आहे. फेसवॉशचे महत्त्व फेसवॉश हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, तर तो त्वचेची खोलवर निगा राखतो. योग्य फेसवॉशमुळे — चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते. मुरूमांची समस्या नियंत्रणात राहते. त्वचा तजेलदार …

    Read More »
  • 20 July

    माणसांप्रमाणे प्राण्यांनादेखील पडतात स्वप्ने!

    स्वप्न पडणे ही सामान्य गोष्ट आहे. जवळपास प्रत्येक मनुष्याला हा अनुभव येतो. पण माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील स्वप्न पडतात, असे संशोधनातून समोर आले आहे. अनेक महान तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञांनीदेखील यावर भाष्य केले आहे. प्राण्यांना स्वप्न कसे पडते, स्वप्न पडताना त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात आणि याबाबत विज्ञान काय सांगते, ते लक्षवेधी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेले संशोधन आणि जगभरात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासात प्राण्यांना …

    Read More »
  • 20 July

    अश्वेत अभिनेत्याची यशोगाथा

    सिडनी पॉइटियर हे बहामासमधील हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. वर्ण किंवा रंग माणसाच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचा जीवनसंघर्ष. १९६४ मध्ये ‘लिलीज ऑफ द फील्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार (ऑस्कर ) मिळवणारे ते पहिले आफ्रिकन अमेरिकन होते. पण त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना अनेक अडथळे आणि निराशेवर मात करावी …

    Read More »
  • 20 July

    वृक्षारोपणाचा नको दिखावा

    वृक्षारोपण हा आता उत्साही कार्यक्रम झाला आहे. ज्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते तेवढे त्या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मग पुन्हा पुढच्या वर्षी उत्साहात वृक्षारोपण केले जाते. मानव इतर सजीवांपेक्षा बुध्दिमान असला तरी तोसुध्दा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ आहे. मानवाकडेच त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे व त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. …

    Read More »