लेख-समिक्षण
  • 17 Aug 2025

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4199

TimeLine Layout

June, 2025

  • 22 June

    मिक्सर ग्राइंडर वापरताना…

    पमिसर आणि ग्राइंडर हे प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्त्वाचे उपकरण आहे. चटणी, मसाले, पेस्ट, आणि अन्य पदार्थ तयार करण्यासाठी मिसरचा वापर होतो. मात्र, चुकीच्या वापरामुळे या उपकरणांचे आयुष्य कमी होते किंवा ते वारंवार बिघडतात. त्यामुळेच त्यांचा वापर योग्य पद्धतीनेच करायला हवा. मिसर प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये येतो. हँड मिसर आणि स्टँड मिसर. याचा उपयोग द्रव पदार्थ एकत्र करण्यासाठी किंवा पीठ मळण्यासाठी होतो. मिसरमध्ये …

    Read More »
  • 22 June

    बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला

    जगभरात सध्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. एवढंच नव्हे तर याच्या उपचाराकरिता वापरली जाणारी औषधे प्रभावहिन होत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या चोरपावलांनी पसरत असलेल्या धोक्याची वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील आण्विक जीवशास्त्रज्ञ नॉर्मन व्हॅन रिजन यांच्या मते, जागतिक आरोग्य चर्चांमध्ये बुरशीजन्य रोगजनक आणि अँटिफंगल प्रतिरोधकतेच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. …

    Read More »
  • 22 June

    राजर्षी टंडन यांचा आदर्शवाद

    राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन त्या काळात उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मनमिळावूपणामुळे त्यांच्या घरी नेहमीच पाहुण्यांचे येणे-जाणे चालू असायचे. त्या काळात देशात गहू आणि तांदळाचा तुटवडा होता. सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत (रेशन दुकानदारांमार्फत) गहू-तांदळाचा पुरवठा सुरू केला होता, जेणेकरून सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात अन्नधान्य मिळू शकेल. टंडनजींच्या घरात गहू-तांदूळ आठवडाभरातच संपून जात असे. मग ज्वारी किंवा जवसारख्या धान्यांच्या भाकर्‍या बनवल्या जात. …

    Read More »
  • 22 June

    ‘चोकर्स’चा शिक्का पुसला

    यश मिळविण्यासाठी माणूस जंगजंग पछाडत असतो. अगदी ओठापर्यंत आलेला घास हिरावला जातो तेव्हा तो निराश होणे साहजिक आहे. अशा वेळी त्याला यश हे पा-यासारखे आहे असे वाटत असते. अनेकवेळा अंतिम रेषेपर्यंत मजल मारूनही अंतिम रेषा ओलांडणे जमत नाही तेव्हा ‘चोकर्स’चा शिक्का बसतो. चोकर्स म्हणजे ऐनवेळी हातपाय गाळणे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने हा अनुभव अनेकवेळा घेतला आहे. सुमारे तीन दशके ‘चोकर्स’ची …

    Read More »
  • 22 June

    विद्यार्थीहितैषी पाऊल

    भारतातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहतात. विशेषतः ग्रामीण व दुर्बल आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांसाठी शिक्षण कर्ज घेणे हे एक जटिल व कठीण प्रक्रिया ठरते. शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे आणि आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन असताना त्याचा दरवाजा जर आर्थिक अडचणींमुळे बंद राहत असेल, तर ते देशाच्या मानवी संसाधनावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरते. यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे. …

    Read More »
  • 22 June

    ३ हजारांमध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास!

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जगभर फिरत असतात. तेथून काही आयडिया घेऊन भारतात येतात आणि आपल्या मंत्रालयामार्फतत्या राबवित असतात. आता अशीच एक नवीन आयडिया आणली असून ती देशभरात १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त …

    Read More »
  • 22 June

    भाषाविषयक धोरण आणि महाराष्ट्र

    नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमलबजावणी करताना महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्त तरी मागं घेण्यात आला आहे. आता भारतातील सर्व भाषा जोपासल्या, जोडल्या जातील असं भाषा धोरण आखून ते महाराष्ट्रात अमलात आणलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या सुनियोजित भागांमध्ये मराठी-इंग्रजीच्या पाठोपाठ तिसरी भाषा म्हणून कन्नड, तेलगू, उडिया यांसारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यातून संपूर्ण देशाला एकात्म करण्याचं …

    Read More »
  • 22 June

    अरण्यऋषीचा अलविदा

    मराठी साहित्यविश्वाच्या समृद्ध परंपरेला निसर्गअभ्यासातून, पशुपक्ष्यांच्या अभ्यासातून मौलिक लेखन करुन अधिक समृद्ध करणारे अरुण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या लेखनातून व जीवनातून केवळ निसर्गसेवा व वन्यजीवाबद्दलची कळकळ आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास दिसून आला. पर्यावरण संवर्धनाचा वसा जीवापाड जोपासलेला अरुण्यऋषी आज निसर्गाच्या कुशीत विसावला. त्यांची निसर्गाची भटकंती थांबली, पण त्यांच्या विचारांची, तत्त्वज्ञानाची आणि निसर्ग भक्तीची …

    Read More »
  • 15 June

    ओपी नय्यर आणि लता मंगेशकर यांच्यात का बिनसले?

    हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकार होऊन गेले, ज्यांची गाणी अजरामर झाली. यापैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे ओंकार प्रसाद नय्यर, ज्यांना ओ.पी. नय्यर म्हणून ओळखले जाते. नय्यर यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते; पण एकेकाळी आपल्या कौशल्यामुळे सर्वाधिक मानधन मिळवले. प्रत्येक गाण्यात विशिष्ट प्रकारचा ठेका देणाया नय्यर यांची वयाच्या १७ व्या वर्षी संगीतजगताशी ओळख झाली. त्यांनी शास्त्रीय …

    Read More »
  • 15 June

    पावसाचे रुपेरी रंग

    हिंदी सिनेसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात आजवर शेकडो चित्रपटांत पावसाने आपल्या वाटा शोधल्याचे दिसले. प्रेम, वासना, विरह, आतुरता, क्रौर्य, प्रतिशोध आदी अनेक प्रकारच्या भावनांची पावसाशी सांगड घालून ती कथानकात बसवून आकर्षकपणाने दृश्यांमध्ये चित्रीत केली गेली. शोमन राज कपूर यांचे पावसावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच की काय, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नर्गीससोबतचे त्यांचे पाऊसगाणे सिनेसृष्टीचे जीवनगाणे बनून गेले. जुन्या …

    Read More »