लेख-समिक्षण

विशेष

‘अभिजात’ तेचा मुकुट मिरवताना…

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेमध्ये पाली, प्राकृत, बांगला, असामिया आणि मराठी या भाषांचा समावेश अभिजात भाषांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. मराठी भाषेला क्लासिकल किंवा अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. हा दर्जा देण्याची मागणी याआधीही पूर्ण करता आली असती. नेमकी निवडणुकीच्या तोंडावर ती पूर्ण करणे हा योगायोग आहे की प्रयोजन आहे हा विचार करण्यासारखा आहे. पण आजच्या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या …

Read More »

‘नीट’ रद्द कशासाठी?

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) च्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात खटला सुरू आहे. यादरम्यान नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पण सध्याची व्यवस्था मोडीत काढली तर त्याजागी कोणती व्यवस्था लागू होणार आहे? तसेच ‘नीट’ व्यवस्था अमलात येण्यापूर्वी प्रवेश परीक्षेचे स्वरुप कसे असायचे आणि त्याचे काय गुण दोष होते, या प्रश्नांची उत्तरे तपासावी लागतील. तसेच त्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर …

Read More »

बदलापूर एन्काऊंटर वादाच्या भोवर्‍यात

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयात याचिका दाखल झाली असताना अक्षय शिंदे चकमक प्रकरणाच्या तपासाला गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वेग दिला आहे. सीआयडीचे …

Read More »

एकत्रित निवडणुकीलो आव्हान ‘एकमताचे’

केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारत ‘एक देश एक निवडणुक’ प्रस्तावाला मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणले जावू शकते. या विधेयकाला मिळणार्‍या संमतीवरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असेल. एक देश एक निवडणुकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल, द्रमुक, ‘आप’सारखे जवळपास 15 पक्ष आक्षेप नोंदवत असतील तर हा अजेंडा पुढे सरकेल, असे वाटत नाही. केंद्र …

Read More »

शेअर ट्रेडिगच्या चक्रव्यूहात

बाजार नियामक संस्था सेबीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सरासरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 4 लाख गुंतवणूकदारांना या काळात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे. अलीकडील काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून कर्जबाजारी …

Read More »

एक देश-एक निवडणूक लागू करणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात एकाचवेळी सर्व निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एक देश एक निवडणूक याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला साडे अठरा हजार पानांचा अहवाल विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच सुपूर्द केला …

Read More »

राहुल गांधीच्या विदेशवाणीचा अन्वयार्थ

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका दौर्‍यादरम्यान भारतात शीख धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे आणि संघराज्याचा पाया मोडला जात आहे, धार्मिक उन्माद वाढवण्याचा प्रयत्न केला जात असून भाषे सोबत छेडछाड केली जात आहे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येत हुकूमशाही सुरू आहे अशा अनेक आरोपांची माळ उडवली आहे. राहुल गांधी आणि इतर नेते भारतातही या सगळ्या गोष्टी …

Read More »

विकासाच्या जमिनीवरचे वर्तमान

दरवर्षी भारतातील तीन महिन्यांच्या सणासुदीत ऑटो डीलर्सपासून रेस्टॉरंट चेनपर्यंतचे व्यवसाय त्यांच्या वार्षिक विक्रीच्या 20 ते 30 टक्के पैसा कमवतात. पण यंदा देशातील पारंपारिक सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होताच भारतीय शहरांमधील ग्राहक खर्चात कपात करत आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या प्रमुख अर्थव्यवस्थेसाठी हे चिंताजनक लक्षण आहे. कार विक्री, विमान प्रवास आणि पॅकेज्ड फूडवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. मारुती सुझुकीसारख्या कार …

Read More »

देशात पुन्हा सांप्रदायिक आग

गणपती विसर्जनावेळी कर्नाटकातील नागमंगला शहरात बुधवारी दोन गटात झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले आहे. विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर हाणामारी झाली आणि मग हिंसाचाराला सुरुवात झाली. यावेळी दगडफफेक करून अनेक दुकाने, वाहने पेटवली. त्याच दिवशी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत आंदोलन सुरू …

Read More »

मणिपूर ‘वाचवायचे’ तर…

मणिपूर सरकार, सुरक्षा दल आणि केंद्र सरकार सध्या हिंसाचाराच्या अप्रत्यक्ष भोवर्‍यात अडकले आहे. गुप्तचर संघटनांना मणिपूरमधील ताज्या हल्ल्याचा अंदाज घेण्यात अपयश आले किंवा प्रत्युत्तराची बाजू कमी पडली असे म्हणावे लागेल आणि अर्थातच ही बाब दुर्देवी आहे. कुकी आता केवळ वेगळे राज्यच नाही तर वेगळा देश कुकीलँड मागत आहेत. त्यात संपूर्ण ईशान्य आणि बांगलादेशचा काही भागाचा समावेश करत आहे. दुसरीकडे नागा …

Read More »