लेख-समिक्षण

विशेष

तिरंग्याला 21 वेळा वंदन करण्याची शिक्षा

भोपाळ येथील एका आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला 21 वेळा वंदन केले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली होती. या आरोपीने पाकिस्तान समर्थनपर घोषणा दिल्या होत्या. हा आरोपी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर होऊन ‘भारतमाता की जय’ म्हणाला. त्याने तिरंग्याला 21 वेळा वंदन केले. विशेष म्हणजे जामिनावर मुक्तता मिळण्यासाठी या अटीचे पालन …

Read More »

याला ‘आजार’ ऐसे नाव?

मथळा वाचून तुम्हाला एखादा गंभीर आजार किंवा रोगाविषयी लेख असेल, असे वाटू शकते. मात्र इथेच तुमची गल्लत होऊ शकते. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एका ठिकाणी बोलताना देशाबाहेर जाण्याचा तरुणांना ‘आजार’ झाला असल्याचे मत मांडले. अर्थात तरुणाई देशाबाहेर का जात आहे? कशामुळे देश सोडण्याची वेळ आली ? यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. श्रीमंत देश वगळली तर सर्वच विकसनशील देशात …

Read More »

बालविवाहांचे कटू वास्तव

नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी 2022 मध्ये बालविवाह मुक्त भारत आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाचा उद्देश 2030 पर्यंत देशातून बालविवाहाचे उच्चाटन करणे हा होता. पण आजही कोठे ना कोठे धर्माच्या, प्रथेच्या पडद्याआड बालविवाह होण्याचे प्रमाण पाहता हे लक्ष्य गाठणे कठीण वाटत आहे. ‘युनिसेफ’च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 18 वर्षापेक्षा कमी वयोगयातील सुमारे पंधरा लाख मुलींचे विवाह होतात आणि भारत …

Read More »

व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पाड पडेल.झारखंडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यानंतर बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्होट जिहाद संज्ञेचे चौकशी करण्याचा इशारा दिला. राज्यातील 288 तर झारखंडमधील …

Read More »

आघाडीची कसोटी

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …

Read More »

हरहुन्नरी अतुल

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्‍या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …

Read More »

हरियाणात काँग्रेसचे पानिपत

लोकसभा निवडणुकीनंतरची हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यासाठी ’लिटमस टेस्ट’ होती. काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह आणि मुख्यमंत्रिपदावरून भूपेंद्रसिंह हुडा व कुमारी सेलजा या प्रमुख नेत्यांमधील भांडणे हे पराभवाचे ठळक कारण मानले जाते. तसेच वादग्रस्त बाबा राम रहीम याला निवडणुकीच्या तोंडावर अचानक पॅरोल देण्यात आला. त्याने भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले व त्याच्या समर्थकांनी, विशेषतः दलित समाजाने भाजपच्या पारड्यात मते …

Read More »

दीपस्तंभ…

रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला …

Read More »

‘स्वच्छ’ भरारी

भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …

Read More »

फडणवीस व उद्धव यांची पुन्हा युती?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. स्वत: फडणवीस रात्री 12 वाजता गाडी चालवत ’मातोश्री’वर जाऊन त्यांनी ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ’एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी …

Read More »