मथळा वाचून तुम्हाला एखादा गंभीर आजार किंवा रोगाविषयी लेख असेल, असे वाटू शकते. मात्र इथेच तुमची गल्लत होऊ शकते. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एका ठिकाणी बोलताना देशाबाहेर जाण्याचा तरुणांना ‘आजार’ झाला असल्याचे मत मांडले. अर्थात तरुणाई देशाबाहेर का जात आहे? कशामुळे देश सोडण्याची वेळ आली ? यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. श्रीमंत देश वगळली तर सर्वच विकसनशील देशात …
Read More »कव्हर स्टोरी
आघाडीची कसोटी
लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …
Read More »दीपस्तंभ…
रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला …
Read More »‘अभिजात’ तेचा मुकुट मिरवताना…
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेमध्ये पाली, प्राकृत, बांगला, असामिया आणि मराठी या भाषांचा समावेश अभिजात भाषांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. मराठी भाषेला क्लासिकल किंवा अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. हा दर्जा देण्याची मागणी याआधीही पूर्ण करता आली असती. नेमकी निवडणुकीच्या तोंडावर ती पूर्ण करणे हा योगायोग आहे की प्रयोजन आहे हा विचार करण्यासारखा आहे. पण आजच्या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या …
Read More »एकत्रित निवडणुकीलो आव्हान ‘एकमताचे’
केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारत ‘एक देश एक निवडणुक’ प्रस्तावाला मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणले जावू शकते. या विधेयकाला मिळणार्या संमतीवरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असेल. एक देश एक निवडणुकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल, द्रमुक, ‘आप’सारखे जवळपास 15 पक्ष आक्षेप नोंदवत असतील तर हा अजेंडा पुढे सरकेल, असे वाटत नाही. केंद्र …
Read More »राहुल गांधीच्या विदेशवाणीचा अन्वयार्थ
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका दौर्यादरम्यान भारतात शीख धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे आणि संघराज्याचा पाया मोडला जात आहे, धार्मिक उन्माद वाढवण्याचा प्रयत्न केला जात असून भाषे सोबत छेडछाड केली जात आहे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येत हुकूमशाही सुरू आहे अशा अनेक आरोपांची माळ उडवली आहे. राहुल गांधी आणि इतर नेते भारतातही या सगळ्या गोष्टी …
Read More »मणिपूर ‘वाचवायचे’ तर…
मणिपूर सरकार, सुरक्षा दल आणि केंद्र सरकार सध्या हिंसाचाराच्या अप्रत्यक्ष भोवर्यात अडकले आहे. गुप्तचर संघटनांना मणिपूरमधील ताज्या हल्ल्याचा अंदाज घेण्यात अपयश आले किंवा प्रत्युत्तराची बाजू कमी पडली असे म्हणावे लागेल आणि अर्थातच ही बाब दुर्देवी आहे. कुकी आता केवळ वेगळे राज्यच नाही तर वेगळा देश कुकीलँड मागत आहेत. त्यात संपूर्ण ईशान्य आणि बांगलादेशचा काही भागाचा समावेश करत आहे. दुसरीकडे नागा …
Read More »निकाल ठरवतील दिशा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण वेगाने बदलले आहे. राजकीय पंडितांनी, पक्षांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वेगळे निकाल लागले आणि लोकसभेला एकट्या जीवावर बहुमत मिळवत सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. पुन्हा एकदा आघाडी सरकारचे पर्व सुरू झाले.तिसर्यांदा भाजप आघाडी सत्तेवर आल्यानंतरच्या देशभरातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मोदी सरकारची राजकीय अपरिहार्यता प्रकर्षाने समोर आली. उदा. ‘लॅटरल एंट्री’वर यूटर्न किंवा वक्फ बोर्ड दुरुस्ती …
Read More »सामरीक सामर्थ्याला नवे बळ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण करार झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी ‘सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट’चा करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी फायटर जेट इंजिनच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे पुढे जाण्यास सहमती दर्शवली आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म, आधुनिक शस्त्रे, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम इत्यादींच्या सह-उत्पादनाबाबतही बोलणी पुढे सरकली आहेत. अमेरिका भारताला पाणबुडीविरोधी शस्त्र सोनोवॉय …
Read More »अत्याचार दाही दिशा!
शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, कामाची जागा, सार्वजनिक ठिकाण, घर कुठेही मुली, महिला आणि मुले सुरक्षित नाहीत. अलीकडच्या काळात समाजात लैंगिक विकृती एवढी वाढली आहे की, तीन-चार वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाहीत आणि 60 ते 80 वर्षे वयाच्या महिलाही सुरक्षित नाहीत. लैंगिक हिंसाचाराच्या घटना सर्वत्र उघडकीस येत असल्याचे पाहून संपूर्ण सामाजिक स्थिती निरोगी नसल्याचे दिसून येते. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाने देश हादरला असतानाच महाराष्ट्रातील …
Read More »