इटलीच्या एका साध्या कुटुंबात जन्मलेले गुच्चिओ गुच्ची हा नावारूपाला येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. गुच्चिओचा यांचे वडील हॅटमेकर होते, पण घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. लहानपणापासूनच त्यांना मोठं काहीतरी करायचं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याला अनेकदा संधी मिळत नव्हत्या. तरुणपणी त्यांनी लंडन आणि पॅरिसमध्ये छोटे-मोठे काम केले.
एका हॉटेलमध्ये ते साध्या नोकरासारखे काम करत होते. पण हे काम करत असताना त्याला एका गोष्टीची जाणीव झाली की, श्रीमंत लोकांची लक्झरी ब्रँड्सबद्दल असलेली आवड! त्यांनी वापरणार्या उच्च प्रतीच्या वस्तू, विशेषतः सुटकेस आणि बॅग्ज, यांच्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. सुरुवातीला गुच्चिओंकडे मोठी गुंतवणूक करण्याइतका पैसा नव्हता; पण त्यांनी आपल्या लहानशा बचतीतून आणि जिद्दीच्या जोरावर 1921 मध्ये फ्लोरेन्स येथे गुस्सी ब्रँडची स्थापना केली.
उच्च प्रतीच्या लेदर वस्तू बनवण्याचा त्याचा मानस होता. सुरुवातीला लोकांना हे महाग वाटायचं, पण गुच्चिओंना माहित होतं की गुणवत्तेच्या जोरावरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यांनी लेदर बॅग्ज, सूटकेस आणि बेल्ट यांची निर्मिती केली, जे पुढे जाऊन जगभरात प्रसिद्ध झाले. पण दुसर्या महायुद्धाच्या काळात त्याचा व्यवसाय जवळजवळ बंद पडण्याच्या स्थितीत आला. त्यांना साहित्य मिळेनासं झालं, कच्चा माल महागला आणि विक्रीही घटली. मात्र, इथेच त्यांच्या हुशारीची खरी कसोटी लागली.
लेदरचा तुटवडा असताना त्यांनी कॅनव्हास बॅग्ज बनवण्याचा नवा प्रयोग केला. त्या बॅग्सवर त्याने खास डिझाइन बनवले, जे पुढे जाऊन गुस्सी ब्रँडची ओळख बनले!
गुच्चिओंची मेहनत, चिकाटी आणि गुणवत्तेमुळेच गुस्सी ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचला, आज गुच्चीचा लोगो आणि त्याची डिझाइन्स ही लक्झरी आणि उच्चभ्रू वर्गाची ओळख बनली हे खरे नाही काय?
Check Also
कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची
प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. …