लेख-समिक्षण

देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक

सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. ‘क्लिन एनर्जी’वर चालणार्‍या या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. तसेच जीवाश्म इंधनदरवाढीच्या काळात ही वाहने लोकांना किफायतशीरही वाटतात. चारचाकी, दुचाकी वाहनांपासून चक्क विमानांपर्यंतही अशी वाहने बनवली जात आहेत. आता आपल्या देशात पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईकही समोर आली आहे. देशातील पहिल्या सुपरबाईकचा मान ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ ला मिळाला आहे.
या बाईकचा कमाल वेग ताशी 265 कि.मी. असा आहे. केवळ 3 सेकंदांत ही बाईक ताशी शून्य ते 100 किलोमीटरची गती गाठते. ही बाईक 120 बीएचपीची पॉवर जनरेट करेल. या बाईकचे वजन 178 किलो आहे. ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ चे व्हीलबेस 1400 एमएमचे आहे. या कारची उंची 1050 एमएम इतकी आहे. बाईकला समोरुन आणि मागील बाजूस 17 इंचाचे टायर देण्यात आले आहे. बॉडी कार्बन फायबरची आहे. ही बाईक भारतीय 2 डब्ल्यू इंडस्ट्रीमध्ये अत्याधिक वेगाने धावणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या ही बाईक बाजारात दाखल झाली नाही. ती प्रोटोटाईपमध्ये समोर आली आहे. लवकरच ही बाईक बाजारात येईल. ती टॉप स्पीड देणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक ठरणार आहे. वेगाने क्वार्टर माईल पूर्ण करणारी ही भारतातील पहिली बाईक असेल. ही सुपरबाईक ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ च्या प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात येणार आहे. ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ आधीच भारतीय बाजारात आलेली असून निवडक पाच शहरांमध्ये तिची विक्री होते.

Check Also

कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची

प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *