लेख-समिक्षण
  • 5 Jan 2025

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4197

TimeLine Layout

December, 2024

  • 22 December

    डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलून अमित शहा वादात

    डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलणे एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…..एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता, असे केंद्रीय मंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले. हे बोलल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या समर्थनार्थ सहा ट्विट केले. तर स्वत: गृहमंत्री शहा यांनी पत्रपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या विधानाचे …

    Read More »
  • 22 December

    मुद्यांपासून भरकटलेले अधिवेशन

    नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आतापर्यंत जे काही पाहायला मिळाले त्यावरुन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेली अविश्वास प्रस्तावाची नोटीस ही भारतीय संसदेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. या प्रस्तावाचा सरळसरळ अर्थ देशाच्या उपराष्ट्रपतींवर अविश्वास व्यक्त करणे आहे. संविधानावरील चर्चा असेल किंवा अदानींचा मुद्दा असेल, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी कामकाजाबाबत …

    Read More »
  • 22 December

    तबला पोरका झाला…

    तबला या वाद्यसंगीतातील महत्त्वाच्या वाद्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि सन्मान मिळवून देण्याचं अद्वितीय कार्य करणार्‍या पंडित झाकीर हुसेन यांच्या निधनाची वार्ता अखेरच्या क्षणापर्यंत अफवा ठरावी असं असंख्य जणांना वाटत होतं. पण अखेर ती खरी ठरली आणि नियतीनं एक महान तबलावादक आपल्यातून हिरावून नेला. तबला म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन हे समीकरण वर्षानुवर्षं आपल्याकडं पहायला मिळतं यातच त्यांचं श्रेष्ठत्व दडलेलं आहे. त्याचबरोबर …

    Read More »
  • 15 December

    नीनांचे भयानक रूप

    सध्या सोशल मीडियावर ’गंजी चुडैल’ हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सुप्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखणे देखील कठीण झाले आहे. ज्यामध्ये तिचा भयंकर लूक पाहायला मिळत आहे. ‘पंचायत’ फेम बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता ह्या या भयानक रुपमध्ये पाहायला मिळत आहे. नीना गुप्तांच्या आगामी प्रोजेक्टमधील लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यात त्या ‘गंजी चुडैल’च्या लूकमध्ये दिसत आहे. त्यांचीही अजब स्टाईल पाहून …

    Read More »
  • 15 December

    वितंडवादी घराची, सवंग लोकप्रियता

    प्रेक्षकांची अभिरुची जसजशी बदलत आहे, तसतसा मनोरंजनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा दर्जाही ढासळत आहे. 1980 च्या दशकांत दूरचित्रवाणीवर हमलोग, नुक्कड, देख भाई देख, रामायण, महाभारत यासारख्या दर्जेदार मालिकांनी भारतीय समाज मनावर सखोल आणि सकारात्मक परिणाम केला होता. ंयाउलट आताच्या बहुतांश मालिका द्वेषावर किंवा अश्लिलतेचा कळस गाठणार्‍या आहेत. गेल्या दीड दोन दशकांपासून बिग बॉसने भारतीय दूरचित्रवाणीवर बस्तान मांडले आहे. लोकांच्या घरातील भांडणे टिव्हीवर …

    Read More »
  • 15 December

    चिकित्सक वृत्ती वाढवा

    शालेय जीवन असो किंवा व्यावसायिक करियर असो आपल्या अंगी चिकित्सक, विश्लेषक कौशल्य, चौकस बुद्धी अत्यावश्यक आहे. या वृत्तीमुळे आपण कोणत्याही अडचणींवर, प्रश्नांवर सहजपणे मात करू शकतो. सध्याच्या व्यावसायिक जीवनात अ‍ॅनालिटिकल स्किलला अत्यंत महत्त्व आले आहे. अनेकांना कौशल्य विकास करायचा असतो, परंतु तो कसा करावा, याचे तंत्र अवगत नसते. आपल्या अंगी विश्लेषक कौशल्य वाढवण्यासाठी आजघडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वेळोवेळी आपण …

    Read More »
  • 15 December

    घरगुती स्क्रब कसे बनवाल?

    मुलायम आणि तजेलदार त्वचा आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. त्वचेची नियमित देखभाल म्हणूनच खूप गरजेची असते. सभोवतालच्या वातावरणाचा, धूळ, धूर, ऊन वार्‍याचा परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे बाह्यत्वचा काळवंडते, निस्तेज होते. बारीक धुळीचे कण त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकून बसतात. अशावेळी त्वचेचे स्क्रबींग करणे आवश्यक असते. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. तसेच त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसू शकते. बाजारात तयार …

    Read More »
  • 15 December

    कोलेस्टेरॉलमुळे कर्करोग?

    कोलेस्टेरॉलमुळे केवळ हृदयविकाराचाच धोका संभवतो असे नाही. मानवी शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उपउत्पादनामुळे एस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांची वाढ होते व परिणामी अनेक प्रकारचे स्तनांचे कर्करोग यामुळे होतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. डुक कर्करोग संस्थेच्या वैज्ञानिकांना असे दिसून आले की, स्टॅटिनसारखी कोलेस्टेरॉल प्रतिबंधक औषधे एस्ट्रोजेनच्या रेणूंचा परिणाम नष्ट करतात. या अभ्यासाने प्रथमच कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण व विशेषत: रजोनिवृत्तीनंतर स्तनांचा कर्करोग यांचा संबंध जोडला …

    Read More »
  • 15 December

    यशोगाथा जगज्जेत्याची

    डी. गुकेश या तरुण, तडफदार बुद्धीबळपटूने जागतिक अजिंक्यपद मिळवण्याचा महाविक्रम नुकताच नोंदवला. यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही जगज्जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षांनंतर …

    Read More »
  • 15 December

    पवारांचे फसते डावपेच

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे खर्‍या अर्थाने जनक. 2019 च्या विधानसभा निवडणुकात गलितगात्र झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी एकहाती ऊर्जित अवस्थेत आणला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाराष्ट्रात ही लाट एकहाती थोपवून धरली ती देखील शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपेक्षा असलेला नेता आणि …

    Read More »