सोशल नेटवर्किंगमधील सर्वात लोकप्रिय असलेले फेसबुक आणि व्हॉटसअपमधील संदेश आता अधिक सुरक्षित केलेे आहेत. संदेशाची देवाणघेवाणीचा गैरवापर होऊ नये यासाठी फेसबुकने एंड टू एंड इंक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. यामुळे संदेश अधिक सुरक्षित, संरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे. या वैशिष्ट्याला आणखी एक नाव दिले आहे ते म्हणजे ‘सिक्रेट कर्न्व्हजन्स’. संदेश पाठविणारा आणि स्विकारणाच व्यक्ती आता तो संदेश पाहू शकणार आहे. सोशल …
Read More »TimeLine Layout
September, 2024
-
1 September
जुने टीशर्ट टाकताय?
प्रत्येक कुटुंबातील कपाटात भरभरून कपडे असतात. नवं नवीन फॅशन बाजारात येत असल्यामुळे आपण त्या फॅशनेबल कपड्याची खरेदी करतो. आपल्याला कोणी प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलेले असतात तर कधी लग्न कार्यात मिळालेले असतात. काही जणांना कपडे खरेदी करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे कपाट खूप भरतं. मग या कपड्यांचे करायचे काय असा प्रश्न मनात तयार होतो? आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला देखील आवडत …
Read More » -
1 September
केसांसाठी मोहरीचे तेल !
मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिडचे अधिक प्रमाण आढळते, जे केसांची वाढ वेगाने करण्यासाठी आणि केसांना अधिक निरोगी राखण्यासाठी मदत करते. या तेलामुळे केस अधिक घनदाट, मजबूत आणि चमकदार बनतात. यामध्ये असणारे प्रोटीन आणि बीटा-कॅराटिन केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतात. यातील जीवाणूविरोधी आणि अँटीफंगल गुण स्काल्पमध्ये फंगल इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात आणि कोंड्यापासून दूर ठेवते. आजकाल एका घरात किंवा कार्यालयांमध्ये …
Read More » -
1 September
कोट्याधिश कृषीसखी
दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकर्यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धानं हे शिवधनुष्य पेललं. आज ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. …
Read More » -
1 September
शाळांचे वेगवेगळे परीक्षा मंडळ कशासाठी?
देशात विविध राज्यांत असलेल्या परीक्षा मंडळांच्या परीक्षेत एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्य सरकारांशी चर्चा करत असून त्याचे सार्थक परिणाम हाती येणे अपेक्षित आहे. देशभरात सध्या साठपेक्षा अधिक परीक्षा आणि अभ्यास मंडळ आहेत. यात अनेक पातळीवर भिन्नता दिसून येते. या भिन्नतेमुळेच राष्ट्रीय पातळीवर होणार्या प्रवेश परीक्षेत विद्यार्थी अडचणीत येतात. एक तर देशातील विविध शिक्षण मंडळांचा अभ्यासक्रम वेगळा आहे अणि …
Read More » -
1 September
डिजिटल स्वप्नव्यत्यय
झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …
Read More » -
1 September
दिज्ञी बंदरात औद्योगिक कॅरिडोर
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये 12 नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महाराष्ट्रातील दिघी बंदराचाही यात समावेश करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी केंद्राने राज्याला दिलेली ही भेट मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या …
Read More » -
1 September
सामरीक सामर्थ्याला नवे बळ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण करार झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी ‘सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट’चा करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी फायटर जेट इंजिनच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे पुढे जाण्यास सहमती दर्शवली आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म, आधुनिक शस्त्रे, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम इत्यादींच्या सह-उत्पादनाबाबतही बोलणी पुढे सरकली आहेत. अमेरिका भारताला पाणबुडीविरोधी शस्त्र सोनोवॉय …
Read More » -
1 September
अजितदादांची कोंडी झालीय?
लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिकेत बदल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांशी ताळमेळ बसविण्यासाठी ते वेगळी रणनिती आखत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उतरवून मोठी चूक केली असे खळबळजनक विधान अलीकडेच दादांनी केले. काकांशी संघर्ष करून काही फायदा होत नसून उलट शरद पवार यांना अधिक सहानुभूती मिळत असल्याचे दादांच्या लक्षात आले आहे. लोकसभेला पवार …
Read More »
August, 2024
-
25 August
चर्चा सामंथाच्या अफेअरची
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची अफवा …
Read More »