स्पॅनिश चित्रपट ’चॅम्पियन्स’वर बेतलेल्या ’सितारें जमीं पर’ या चित्रपटाने जवळपास २६७ कोटींचा गल्ला जमवला. २० जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित न करता आमिर खानने तो यु-ट्युबवर प्रदर्शित केला. परंतु अनेक वापरकर्त्यांना पैसे देऊनही तो नीटसा पहाता आलेला नाही. त्यामुळे आमिर खानच्या वतीने माफी मागितली आहे. ’सितारें जमीं पर’ या चित्रपटासाठी अनेक ओटीटी कंपन्या उत्सूक होत्या. परंतु आमिर खानने …
Read More »TimeLine Layout
August, 2025
-
17 August
अद्वितीय काजोल
साधारणतः १९७०च्या दशकात जया भादुरी या मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत सहज अभिनयाचे उदाहरण म्हणून ओळखल्या जात असत. नव्वदीच्या दशकात या धाटणीमध्ये तनुजांची कन्या काजोल दाखल झाली. पन्नाशी पार करणारी काजोल आजही तशीच आहे, आरशाने काय सांगितले याकडे फारसे लक्ष न देणारी. ती एकमेवाद्वितीय आहे. काजोल भारतात इतर कुठल्याही अभिनेत्यापेक्षा जास्त भूमिका नाकारते. काजोलचा जिवलग मित्र करण जोहर सांगतो की, काजोल कधीच …
Read More » -
17 August
‘व्हॉटसअॅप’काराची यशोगाथा
जगातल्या संवादाच्या साधनांचा प्रवास जितका उत्कंठावर्धक आहे, तितकाच तो प्रेरणादायीही आहे. आज आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, कुठेही असलो तरी आपल्या प्रियजनांशी क्षणोक्षणी संवाद साधू शकतो, आणि हे शय झाले आहे स्मार्टफोन व मेसेजिंग अॅप्समुळे. या क्रांतीत जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’चा सिंहाचा वाटा आहे. पण या अॅपमागची प्रेरणादायी कहाणी जितकी विलक्षण आहे, तितकीच भावस्पर्शीही आहे. ही कहाणी …
Read More » -
17 August
गुलाबजलद्वारे सौंदर्य प्रसाधने
गुलाब जल हे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाब जल लावल्याने चेहरा तजेलदार आणि स्वच्छ दिसतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा नियमित वापर करु शकतात. गुलाब जलाचा वापर करुन आपण घरच्या घरी स्किन केअर प्रॉडट्सही बनवू शकतो. गुलाबजल मिश्रीत ही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते आणि नैसर्गिक चमक येते. सर्वांत महत्त्वाचे …
Read More » -
17 August
आरोग्यवर्धक ‘लाल सोने ’
जगातील सर्वात महागडा मसाला म्हणजे केशर. इराणमधून अतिशय चांगल्या दर्जाचे केशर जगभर निर्यात केले जात असते. आपल्याकडे काश्मीरमध्येही केशराची शेती होते. हे ‘लाल सोने’ स्वाद व सुगंधासोबतच आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. आहारात केशरचा नियमित समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे …
Read More » -
17 August
अफाट चिकाटी,अपार यश
जुलिया चाइल्ड यांना लहानपणापासूनच विविध प्रकारच्या पदार्थांची आवड होती. त्यांच्या नव्या प्रयोगांमुळे पदार्थ अत्यंत चविष्ट बनत. एकेदिवशी त्यांनी ठरवले की त्यांनी शोधून काढलेल्या रेसिपी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यांनी आपल्या दोन महिला सहकार्यांसोबत मिळून एका पुस्तकाची योजना आखली. त्या पुस्तकाचे शीर्षक ठेवले ‘फ्रेंच कुकिंग फॉर द अमेरिकन किचन’ सहकार्यांसोबत त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून त्या पुस्तकावर पाच वर्षेकाम केले आणि ते …
Read More » -
17 August
समृद्ध राज्यातले आक्रित
कधीकाळी देशाच्या शेतीसाठी आदर्श मानल्या गेलेल्या पंजाबमधील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याने दबून पिचले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सध्याच्या परिस्थितीत कृषी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची नितांत गरज आहे. अलीकडेच लोकसभेत सादर झालेल्या नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या अहवालाने पंजाबमधील शेतकर्यांची गंभीर आर्थिक अवस्था उघड केली आहे. या अहवालानुसार देशातील …
Read More » -
17 August
तेलापलीकडचा संदेश
सध्या सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि अमेरिका एक अतिशय गुंतागुंतीच्या परराष्ट्र धोरणात्मक नात्याच्या टप्प्यावर आहेत. एकतर्फी वर्चस्वापासून मुक्त असणार्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारताच्या स्वायत्त, स्वतंत्र धोरणांचे समर्थन करत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ दडपशाहीसमोर भारताने झुकण्यास नकार देत आपली आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्तता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू केवळ …
Read More » -
17 August
राज्यात १५ हजार पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाने मांडलेल्या १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते. या निर्णयाद्वारे त्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले …
Read More » -
17 August
‘पिरियड शेमिंग’ चा डाग
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणार्या राज्यातील ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद आहे. मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील …
Read More »