लेख-समिक्षण
  • 5 Jan 2025

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4197

TimeLine Layout

December, 2024

  • 8 December

    हट्ट नडला

    आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्‍या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून …

    Read More »
  • 8 December

    कधी जाणार?

    कल्पना करून पाहा अशा जगाची, जिथे प्रत्येकाला आपल्या मृत्यूची तारीख माहीत आहे. काय-काय होईल? कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला आपण कधी ‘जाणार’ हे ठाऊक असल्यामुळं ती प्रॉपर्टीचं व्यवस्थापन करणं टाळतेय किंवा केलंच तरी ते कुणाला सांगत नाहीये.अशा परिस्थितीत मुलं त्या व्यक्तीची ‘मनोभावे’ सेवा करतील? वयानं लहान असूनही आपण आधी जाणार हे ज्याला माहीत आहे, तो कसं वागेल? पती आणि पत्नी आपापल्या मृत्यूची …

    Read More »
  • 8 December

    सत्ता येताच लाडकी बहीण बनली दोडकी

    महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणार्‍या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्या महिलांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेत अपात्र ठरविले जाणार आहे. त्याकरिता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला …

    Read More »
  • 8 December

    पुन्हा देवेंद्रपर्व

    विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळूनही महायुतीच्या सरकार स्थापनेला झालेल्या विलंबामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले; परंतु अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी धूमधडाक्यात पार पडला. दरम्यानच्या काळात निर्माण झालेला गतिरोध हा मंत्रीपदांबाबतची रस्सीखेच कायम असल्याचे दर्शवणारा आहे. परंतु भक्कम बहुमत आणि महायुतीला मिळालेली लोकमान्यता यामुळे या सरकारच्या स्थैर्याबाबत कसलीही चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तथापि विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतलेल्या …

    Read More »
  • 8 December

    गरज सुधारणांची

    देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात जून 1997 मध्ये झाली. त्याआधीही देशात अन्नधान्य वितरणासाठी व्यवस्था होती, पण ती मुख्यत्वे सर्वसामान्यांसाठी होती. देशात लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्देश गरजू आणि गरीब लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा सुनिश्चित करणे हा होता. सप्टेंबर 2013 मध्ये मंजूर झालेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने या प्रणालीला एक नवी दिशा दिली. तथापि, आयसीआरआयईआरच्या अभ्यासानुसार, दरवर्षी 20 दशलक्ष टन अन्नधान्य …

    Read More »
  • 1 December

    पहिल्या कामाचा किस्सा

    आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसायला भाग पाडणारा अभेनेता अंशुमन विचारे यानं अचूक पंच काढत कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमधून चाहत्यांना रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळवून देणार्‍या अंशुमन विचारेला मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नव्हता. साहजिकच, या क्षेत्रात त्याला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. आता वेगवेगळ्या विनोदी नाटकांमधून सिनेमांमधून प्रेक्षकांना …

    Read More »
  • 1 December

    कृष्णधवल चित्रपटांची मोहिनी

    तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे सिनेमांचे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन, सादरीकरण यात आमूलाग्र बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आल्यानंतर प्रेक्षकांना कृष्णधवल चित्रपटांचा विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादानेच कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपट कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच …

    Read More »
  • 1 December

    अभ्यासाच्या सवयी

    शैक्षणिक आयुष्यात अभ्यास ही सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. काही साध्या गोष्टीचे पालन करून अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावता येतील. र्ी विद्यार्थी दशेत यश प्राप्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन हे खूप अवघड कौशल्य असावे लागले. ते ज्यांच्याकडे असते त्यांच्यासाठी यश दूर नाही. अभ्यासाचे वेळापत्रक आधीच तयार करा. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा ठरवून घ्या आणि त्याचे काटेकोर …

    Read More »
  • 1 December

    गच्चीवर बाग फुलवताना…

    बाल्कनी आणि सदनिका यांचे जसे जवळचे नाते तसेच काहीसे टुमदार बंगला आणि त्यावरील प्रशस्त गच्चीचे आहे. पूर्वी गच्चीवरच्या जागेचा वापर फक्त घरातील अडगळीचे सामान ठेवण्यापुरताच होता.काळ बदलला, बंगल्याची आकर्षक डिझाइन्स आकार घेऊ लागली. अडगळीच्या सामानाची विल्हेवाट झाली आणि गच्चीवर फुलझाडांची कुंडी अवतरली. गच्चीवरील या उद्यानात मोठ़या प्रमाणावर हिरवळ, छोटे वृक्ष, फुलझाडे यांना प्राधान्य द्यावे. या या बागांची निगराणी ठेवणे हे …

    Read More »
  • 1 December

    आता अन्न पदार्थांचं स्कॅनिंग

    सध्या अनेक लोक ‘कॅलरी कॉन्शस’ झालेले आहेत. त्यामुळे समोर आलेल्या अन्नपदार्थांमध्ये किती कॅलरीज आहेत, याबरोबरच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होत असते. शिवाय अन्नात अनेक अपायकारक तसेच उपकारक घटकही असतात व ते ओळखणारा स्कॅनर संशोधकांनी विकसित केला आहे. तो सहज वापरता येणारा तर आहेच, पण स्मार्टफोनलाही तो जोडता येतो. आपण जे अन्न खातो त्यात अ‍ॅलरजेन, रसायने, …

    Read More »